सीएसआयटी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सप्ताह निमित्त साहित्य दिवस उपक्रम
पिंपरी : “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020” च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त औद्योगिक शिक्षण मंडळाच्या, सीएसआयटी कनिष्ठ महाविद्यालय, पूर्णानगर येथील इयत्ता बारावी विज्ञान व वाणिज्य च्या विद्यार्थ्यांचे प्राचार्या अपर्णा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी अध्ययन व अध्यापन साहित्य दिवस हा उपक्रम साजरा करण्यात आला.
शिक्षकांनी वेगवेगळे ग्रुप तयार करून, विद्यार्थ्यांनी स्वतः वेगवेगळी शैक्षणिक साधने व माहितीचे सादरीकरण केले. शिक्षण सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी साक्षरता व मूळ संख्या ज्ञान ,प्रौढ शिक्षणाच्या वर्गातून प्रौढांना मूळ संख्या, संयुक्त संख्या इत्यादी विषय शिकवून प्रौढांना गणिताचे धडे शिकविले. शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी क्रीडा दिवसात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांनी पटावरील खेळ व मैदानी खेळ खेळले. शिक्षण सप्ताहाच्या चौथ्या दिवशी सांस्कृतिक दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा व पारंपारिक खाद्यपदार्थ बनवून सादर केले. शिक्षण सप्ताहाच्या पाचव्या सत्रात कौशल्य दिवस निमित्ताने विद्यार्थ्यांनी शैक्षणिक तक्ते, शुभेच्छापत्रे ,महापुरुषांची चित्रे काढली. शिक्षण सप्ताहाच्या सहाव्या दिवशी तंत्रशिक्षण दिवस यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने व संगणकाच्या सहाय्याने कोडिंग डिकोडींग चे प्रोग्राम रन केले. शिक्षण सप्ताहाचा सातवा दिवस इको क्लब मिशन दिवस निमित्ताने विद्यार्थ्यांची इको क्लब समिती स्थापन करून वृक्ष दिंडी काढण्यात आली. त्यातून परिसरात वृक्ष व पाण्याचे संवर्धन हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. त्यानिमित्ताने वृद्धाश्रम व अंधशाळेला विद्यार्थ्यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांचा सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी शिक्षण सप्ताह प्राचार्या अपर्णा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सांस्कृतिक समितीच्या प्रमुख आम्रपाली लांडगे, सरिता शिंदे यांच्या व्यवस्थापनाने व इतर शिक्षकांच्या सहकार्याने पार पडला.