पिंपरी : औद्योगिक शिक्षण मंडळाचे कॉमर्स सायन्स व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्यूनियर कॉलेज पूर्णानगर येथे अकरावी, बारावी वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय क्रीडा दिवस मेजर ध्यानचंद हॉकीपटू यांच्या जन्मदिवसानिमित्त 29 ऑगस्ट हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सी.एस.आयटी कॉलेजच्या प्राचार्या अपर्णा मोरे, प्रमुख पाहुणे अरविंद मोरे (पुणे जिल्हा कुडो संघटना अध्यक्ष ) यांनी विद्यार्थी समवेत सरस्वती पूजन केले. दुसऱ्या सत्रात प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राचार्या अपर्णा मोरे यांनी केला. महाविद्यालयातील क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीयस्तरीय व राज्यस्तरीय विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व तसेच क्रीडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तिसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी क्रीडा विषयावर भाषण व गाणे सादर केले.
प्रमुख पाहुण्यांनी वेगवेगळ्या एस. जी.एफ .आय मान्यताप्राप्त खेळाविषयी माहिती व मान्यताप्राप्त विविध क्रीडा संस्थांची माहिती, विद्यार्थ्यांना आत्मरक्षण कसे करावे, याची माहिती व प्रात्यक्षिक दिले. या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख प्रा.युगंधरा चौधरी यांनी केले. आभार प्रा.धम्मशिला कांबळे यांनी मानले.