प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्रीगणेश मुर्ती स्थापना उत्साहात
साक्री:- श्रीगणेश चतुर्थी सणाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये ढोल-ताशे वाजत गाजत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात आले.
शाळेच्या प्रांगणातील श्रीगणेश मंदीरात श्री गणेश मूर्तीचे हिंदू संस्कृतीप्रमाणे विधीवत पूजन सचिन अहिरराव व कांचन (भाग्यश्री) अहिरराव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांनी पूजन केले. सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्रीगणेशाची आरती गाऊन भाद्रपद तिथी शुभ मुहूर्तानुसार श्रीगणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. “गणपती बाप्पा मोरया”….. एक-दोन तीन-चार गणपतीचा जयजयकार…..आला रे आला गणपती आला……अशा गणेशोत्सवाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. हिंदू धर्मात गणपतीला फार महत्त्वाचे स्थान आहे. सर्व प्रकारच्या शुभकार्यात सर्व प्रथम गणपतीचे पूजन केले जाते. शिव-पार्वतीचा पुत्र गणपतीला विद्येचे दैवत मानले जाते. ज्या दिवशी शंकराने गणपतीला हत्तीचे तोंड लावून त्याला जिवंत केले. त्यादिवशी गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या दिवसाला गणेशचतुर्थी असे म्हटले जाते. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यात हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. या काळात रोज सकाळी आरती म्हटली जाते. मोदकाचा प्रसाद दिला जातो. हे सर्व महत्त्व लक्षात घेऊन. आणि हिंदू संस्कृतीतील परंपरागत सण- उत्सावाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या लक्षात राहावे. यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन शाळेत मोठ्या उत्साहात केले जाते. या ठिकाणी सुंदर अशी सजावट आणि विद्युत रोषणाई केली जाते. मूर्तीच्या आजूबाजूला विद्यार्थी व शिक्षक गोष्टींचे देखावे तयार करतात व फुलांची भव्य आरस देखील बनवत असतात. या दिवसात लहानपणापासून तो मोठ्यांपर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी गंमतीदार खेळ आयोजित केले जातात. दररोज विद्यार्थी श्रद्धेने आणि भक्ती भावाने गणपतीची आरती गातात. आरती पूर्ण झाल्यानंतर सर्वांना गोड पदार्थ वाटत असतात. असा सौख्याचा व एकात्मतेच्या सूत्रात लोकांना बांधणाऱ्या गणपती उत्सवाला सुंदर सुरवात झाली आहे. श्रीगणेश ही रिद्धी सिद्धी ची देवता आहे असे मानले जाते. मोठ्या श्रद्धेने व भक्ती भावाने आरती गाऊन मोदक, नारळाचा प्रसाद वाटून व सुख ,समृद्धीची आरोग्याची आनंदाची आराधना करून गणेशोत्सवाला शाळेत सुरुवात झाली. शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सर्वांना श्रीगणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संयोजन कुणाल देवरे, स्मिता नेरकर, कांचन (भाग्यश्री) अहिरराव यांनी केले. उत्तम सजावट किरण गवळी, दिपमाला अहिरराव, भू्पेंद्र साळुंखे यांनी केले.
श्रीगणेश मुर्ती स्थापनेचा कार्यक्रम श्रीगणेशाच्या गजरात व मोठ्या भक्तीभावाने आनंदात आयोजित करण्यात आला.