अखिल भारत ब्राह्मण महासंघाचा महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना पाठिंबा
पिंपरी : अखिल भारत ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवडतर्फे चिंचवड विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांना पाठिंबा देण्यात आला आहे. महासंघाच्या वतीने पत्राद्वारे पाठींबा जाहीर करण्यात आला आहे.
याप्रसंगी अखिल भारत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष पुष्कराज गोवर्धन, ब्रम्होद्योग प्रदेश उपाध्यक्ष राजन बुडूख, प्रदेश चिटणीस संजय परळीकर, कार्याध्यक्ष महेश बारसवडे, सरचिटणीस आनंद देशमुख, राहुल कुलकर्णी, शामकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष अतुल इनामदार, मकरंद कुलकर्णी, सचिव प्रवीण कुरबेट, महिला अध्यक्ष सुषमा वैद्य, कोषाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, पिं.चिं. ब्रम्होद्योग अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, ब्रम्ह उद्योजक आघाडी अध्यक्ष कार्तिक गोवर्धन, ऋजुता कुलकर्णी, पूर्वा बारसवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी, प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभेतील महायुतीचे अधिकृत उमेदवार जगताप शंकर पांडुरंग यांच्या कमळ निशाणीचे बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे व समस्त ब्राह्मण समाजातील नागरिकांनी १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले. विधानसभा निवडणूक २०२४ ची शेवटच्या टप्प्याची रणधुमाळी सध्या सुरु आहे. ब्राह्मण समाजाच्या पाठीशी कायम आणि ठामपणे उभा असलेला पक्ष म्हणजे भाजपा, म्हणून ब्राह्मण समाजातर्फे महायुतीचे अधिकृत अधिकृत उमेदवार जगताप शंकर पांडुरंग यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे.