प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये “बालदिन” मोठ्या उत्साहात साजरा
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस “बालदिन” उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेचे संस्थापक प्रशांत भीमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक राहुल अहिरे, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील, शाळेचे शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे व्यवस्थापक राहुल अहिरे, मुख्याध्यापिका अनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी बाल दिनाबद्दल भाषण दिले. तसेच नर्सरी व युकेजी च्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य केले. विद्यार्थांना मार्गदर्शन रिनल सोनवणे आणि सुनीता मॅम यांनी केले. अर्चना देसले यांनी बाल दिनाचे महत्त्व पटवून दिले. व्यवस्थापक राहुल पाटील यांनी आपल्या भाषणातून बालदिन का साजरा करतात व त्याचे महत्त्व सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी आपल्या भाषणातून मुले ही घरची फुले व देशाचे भविष्य आहे. शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांचा आनंद अधिक द्विगुणी व्हावा, यासाठी कटपुतली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे चिमुकल्यांचा आनंद द्विगुणि झाला. आभार प्रदर्शन किरण देवरे यांनी मानले.