प्रचिती पब्लिक स्कूलला गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांची भेट
पिंपळनेर : श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) आयोजित नवचैतन्य अभियान अंतर्गत गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांनी प्रचिती पब्लिक स्कूल येथे सोमवारी भेट दिली. शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन करण्यात आले. आबासाहेबांचे औक्षण शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी केले. त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील साहेब, समन्वयक राहुल अहिरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. प्रसंगी, आबासाहेबांनी शाळेची पाहणी केली. श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेच्या पूजनाची सजावट अर्चना देसले, अश्विनी पगार यांनी केली. सुंदर रांगोळीचे रेखाटन किरण देवरे, सुनिता जाधव, वैशाली वाघ यांनी केले. फुलांच्या रांगोळीची सजावट काजल, मयुरी मॅम ,सरिता मॅम, पल्लवी मॅम यांनी केली. फलक लेखन रिनल सोनवणे, अनिता पवार यांनी केले. कार्यक्रमाचे छायाचित्र काजल मॅम व चित्रफित जागृती यांनी केले.
या कार्यक्रमाचे संयोजन अर्चना देसले, अश्विनी पगार यांनी केले. कार्यक्रमावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





















