प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती दि. 11 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील आधुनिक समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी झाली. कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक राहुल अहिरे, मुख्याध्यापिका अनिता पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमासाठी सरिता अहिरे यांनी महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्ताने माहिती दिली.
महात्मा फुले हे महान समाज सुधारक होते. त्यांनी समाजामध्ये स्त्री शिक्षणासाठी स्त्रियांना जागृत केले. तसेच पुणे येथील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले नेहमी म्हणत विद्याही एक संपत्ती आहे. ती जगातील कोणतीही व्यक्ती ही राहून घेऊ शकत नाही. विद्या विना अनेक अनर्थ घडतात हे संपूर्ण जगाला पटवून दिले.
महात्मा फुले जयंती कार्यक्रमानिमित्त सुंदर असे फलक लेखन वैशाली मॅडम यांनी केले. ज्योतिबा फुले यांनी ज्ञान ज्योति पेटवली. स्त्रीसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने आज महिला सन्मानाने जीवन जगत आहेत, असे मनोगत व्यक्त करत स्त्री शक्तीचे उद्धारक क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे छायाचित्र मयुरी सोनार यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेत शिक्षक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.