प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील आणि कन्या स्वरा पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
साक्री: प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील आणि त्यांची द्वितीय कन्या स्वरा पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. या निमित्ताने आदिवासी वस्तीतील गरीब लोकांना आणि मुलांना कपडे व फराळ वाटप करण्यात आले, तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फलोआहार वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षीप्रमाणे, यंदाही शाळेच्या कर्मचाऱ्यांनी साक्री तालुक्यातील आदिवासी गरीब वस्त्यांना भेट दिली. तेथील गरीब लोकांना आणि मुलांना फराळ व कपड्यांचे वाटप करण्यात आले. शिक्षकांनी मुलांना चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. चांगल्या शिक्षणातूनच प्रगती साधता येते, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
गरीब लोकांच्या हितासाठी वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम दरवर्षी शाळेच्या शिक्षकांकडून आयोजित केला जातो.
याशिवाय, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील रुग्णांना फलोआहार वाटप केले.
संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी शाळेचे सर्व कर्मचारी समाजाशी आपली बांधिलकी जपून लोकांना मदत करण्याच्या मुख्य उद्देशाने कार्यरत असतात. त्यांच्या या कार्यातून निराधारांना आधार देणे, आदिवासी गरीब मुलांना दर्जेदार शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, आणि गरजू रुग्णांना फलोहाराची मदत करणे हे त्यांचे मुख्य उद्देश स्पष्ट दिसतात. गरिबांविषयी असलेले त्यांचे प्रेम आणि आदर या कार्यकृतीतून दिसून येतो.
सामाजिक उपक्रमानंतर, शाळेमध्येही सर्व कर्मचाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील आणि त्यांची कन्या स्वरा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या जीवनाविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, तसेच शाळेचे शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे, आणि स्मिता नेरकर यांनी केले. त्यांनी सरांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याविषयी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली.
कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून मोठ्या आनंदात आणि उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. “या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी इच्छा साकार व्हावी. आजचा आपला वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी. आणि त्या आठवणींनी आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं.” या शब्दसुमनांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.