प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे लोकमान्य टिळक जयंती मोठ्या उत्साहात साजरी






पिंपळनेर: प्रचिती पब्लिक स्कूल मध्ये आज बुधवार दिनांक 23 जुलै 2025 रोजी लोकमान्य टिळक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी टिळकांचे जीवन कार्य, विचार व समाजातील योगदान यावर आधारित भाषणे सादर केली.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भिमराव पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर आणि मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रगण्य नेते, समाज सुधारक आणि विचारवंत होते. त्यांना “भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे जनक” असेही म्हटले जाते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात टिळकांबद्दल आपले विचार भाषणातुन व्यक्त केले.
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !”अशी घोषणा विद्यार्थ्यांच्या भाषणातून बाहेर पड़ताच टाळ्यांच्या गजराने वातावरण अगदी

प्रफुल्लित होऊन गेले. पहिलीचा हिमांशू अहिरे, दुसरीचा अंशू कदम आणि मृणाली शिंदे, तिसरीचा कौशिक अहिरे आणि आर्यन अहिरराव ,चौथीची स्वरा घरटे, स्वरा खैरनार आणि अन्वी पाटील, पाचवीचा सार्थक भामरे आणि सिया हसानी, सहावीची लावण्या खैरनार आणि दुर्वा खैरनार, सातवीचा पर्व खैरनार आणि प्रिया नायक आठवीचे स्वयंम भदाणे आणि नैतिक सोनवणे यांनी टिळकांच्या जीवन कार्यावर भाषण दिले. तसेच मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम आणि संस्थेचे समन्वयक अध्यक्ष राहुल पाटील सर यांनी आपल्या भाषणातून टिळकांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.
आजच्या कार्यक्रमाचे नियोजन प्रेरणा नांद्रे यांनी केले होते. सूत्रसंचालन वैशाली वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांजल सूर्यवंशी आणि वैष्णवी भामरे या विद्यार्थिनींनी केले. तसेच सुंदर फलक लेखन अश्विनी पगार आणि दिव्या जाधव यांनी केले. सुंदर रांगोळीचे रेखाटन प्रतीक्षा अहिरे ,सरिता अहिरे आणि मयुरी सोनार यांनी केले. तसेच टिळकांबद्दल विशेष अशी माहिती वैशाली जगताप व योजना जाधव यांनी दिली. जागृती बिरारीस यांनी सुंदर चित्रफीत तयार केली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रांजल सूर्यवंशी आणि वैष्णवी भामरे या विद्यार्थिनींनी उपस्थितांचे आभार मानले. टिळकांच्या विचारांनी प्रेरित होऊन विद्यार्थी देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
अशा प्रकारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे लोकमान्य टिळक जयंती उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.





















