प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरी करण्यात आली


पिंपळनेर: प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरी करण्यात आली. शाळेचे चेअरमन आदरणीय प्रशांत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन प्रचिती पब्लिक स्कूलच्या शिक्षिका योजना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात अर्चना मॅडम व वर्गातील विद्यार्थ्यांनी सुंदर सूत्रसंचालनाने केली. प्रत्येक वर्गातून दोन विद्यार्थ्यांनी गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे प्रेरणादायी भाषण सादर केले. विद्यार्थ्यांचे हे भाषण उपस्थित सर्वांनी कौतुकाने ऐकले. गुरुपौर्णिमा हे भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचे सण आहे. या दिवशी गुरु–शिष्य परंपरेचे स्मरण होते. गुरु म्हणजे

अज्ञानाच्या अंध:कारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक. “गु” म्हणजे अंध:कार व “रु” म्हणजे प्रकाश – अशा गुरु शब्दाचा अर्थ आहे अंध:कार दूर करणारा. विद्यार्थी जीवनात गुरुचे स्थान आई–वडिलांप्रमाणेच पूजनीय व मार्गदर्शक असते. ज्ञान, शिस्त, संस्कार आणि सद्गुणांचे बीज गुरु आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रोवतो. या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर आणि मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चालक-मालक बंधू यांनी देखील
कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद दिला. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी शीतल शिंपी मॅडम, अश्विनी पगार मॅडम , सुनीता जाधव मॅडम यांनी पार पाडली. गुरुपौर्णिमेचे फलक लेखन सरिता मॅडम आणि किरण देवरे मॅडम यांनी केले. गुरुपौर्णिमेसाठी मुख्य भाषण दिव्या जाधव मॅडम व प्रतीक्षा मॅडम यांनी केले. त्यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, शिक्षकांचे योगदान आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा आदर्श या विषयांवर स्फूर्तीदायक विचार मांडले. कार्यक्रमाचे फोटो मयुरी मॅडम आणि जागृती मॅडम यांनी तर व्हिडीओ शूटिंग वैशाली वाघ मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची बातमी सायली मॅम व वैशाली जगताप मॅडम यांनी लिहिण्याची जबाबदारी घेतली. वोट ऑफ थॅंक्स प्रेरणा मॅडम यांनी दिले. त्यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांचे व सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था वर्गशिक्षकांच्या सहकार्याने शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आली. कार्यक्रम अत्यंत यशस्वी व भावनिक वातावरणात पार पडला.





















