ज्ञानदीपाच्या साक्षीने प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये साजरी झाली गुरुपौर्णिमा गुरुचरणात नतमस्तक विद्यार्थ्यांचे मन

साक्री : गगनात चंद्राची शुद्ध चांदणी फुलली आणि भूमीवर श्रद्धेचा सागर उसळला — कारण होती गुरुपौर्णिमा, आत्मप्रबोधनाचा व सन्मार्गदर्शक दिन. याच पवित्र दिनाचे औचित्य साधून प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे दिनांक 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिपूर्वक आणि भावनांनी ओथंबलेला पार पडला.

याप्रसंगी शाळेचे संस्थापक माननीय श्री प्रशांत पाटील सर यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की शिक्षक समाजाचे दैवत असून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात त्यांचे स्थान अतुलनीय आहे. गुरुपौर्णिमा ही केवळ परंपरा नसून ती आपल्या शिक्षकांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
कार्यक्रमाची सुरुवात वंदे गुरू परंपरेमुळे झाली. विद्यार्थ्यांनी विविध रचनांच्या माध्यमातून गुरुंच्या महिमेचे सुंदर वर्णन करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी गुरुंच्या महत्त्वाचे दर्शन घडवले. “गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ” हे प्रत्येक सादरीकरणातून अधोरेखित होत राहिले.
विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या हस्तनिर्मित भेटवस्तू आणि कार्ड्स देत आपल्या गुरुंप्रतीचे ऋण व्यक्त केले.
या कार्यक्रमात 35 विद्यार्थ्यांनी आपले गुरूप्रति मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमाच्या अखेरीस प्राचार्यां सौ वैशाली लाडे मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शक उद्बोधनातून गुरु-शिष्य परंपरेचे आधुनिक काळातील महत्व उलगडून सांगितले. त्यांनी सांगितले की, “गुरु म्हणजे केवळ शालेय शिक्षक नव्हे, तर जो जीवनात सद्भाव, शिस्त आणि समर्पण शिकवतो तो खरा गुरु.”
याप्रसंगी शाळेचे समन्वयक श्री वैभव सोनवणे सर व श्री तुषार देवरे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे फलक लेखन जितेंद्र कासार यांनी केले.

सूत्रसंचालन राहुल बोरसे यांनी केले तसेच शिवाजी साबळे सर यांनी भाषण दिले.
ज्ञान, संस्कार आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम घडवणारा हा उत्सव विद्यार्थ्यांच्या मनात आयुष्यभरासाठी प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमाचे नियोजन स्मिता नेरकर व नम्रता गोसावी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





















