प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

साक्री: प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज येथे दिनांक १० जुलै २०२५ रोजी इयत्ता नर्सरी ते पहिलीच्या विद्यार्थ्यांन सोबत गुरुपौर्णिमा हा पवित्र दिवस अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. “गुरु असतो गोडवा संस्कृतीचा, गुरु असतो पाडवा दिवाळीचा, गुरु.. असतो उत्सव सणांचा, गुरु असतो बंध नात्याचा..’’

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली. विद्यार्थ्यांनी गुरूपरंपरेचे महत्त्व सांगणारे भाषण सादर केले. “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः…” या मंत्रोच्चारांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना पुष्पगुच्छ व शुभेच्छापत्र देऊन सन्मानित केले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनीही प्रेरणादायी भाषण दिले.
या प्रसंगी शाळेचे संस्थापक व चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील सर यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.
त्यांनी सांगितले की –

“शिक्षक हे समाजाचे दैवत असून, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात त्यांचे स्थान अतुलनीय आहे. गुरुपौर्णिमा ही केवळ परंपरा नसून, ती आपल्या शिक्षकांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.”
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन सौ. स्मिता नेरकर आणि नम्रता गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
प्राचार्या सौ. वैशाली लाडे मॅडम यांनीही मार्गदर्शन करत शिक्षकांचे समर्पित कार्य आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यांचे विशेष कौतुक केले.
या प्रसंगी शाळेचे समन्वयक श्री. तुषार देवरे सर व श्री. वैभव सोनवणे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे फलक लेखन जितेंद्र कासार यांनी केले.
सूत्र संचालन सुनीता पाटील मॅडम यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वी, भावनिक आणि संस्मरणीय ठरला.





















