प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे वन महोत्सव उत्साहात साजरा

साक्री : दि. ७ जुलै २०२५ रोजी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे वन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून विविध प्रकारची झाडे लावली. कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाविषयी जागृती निर्माण करणे हे होते.

संस्थेचे चेअरमन श्री प्रशांत भीमराव पाटील यांनी लागवडसाठी रोपे उपलब्ध करून दिले आणि कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व पटवून सांगितले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य सौ. वैशाली लाडे मॅडम यांनी केले. समन्वयक श्री. तुषार देवरे सर, श्री. वैभव सोनवणे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले.

विद्यार्थ्यांनी “झाडे लावा, झाडे जगवा”, “निसर्ग वाचवा, भविष्य घडवा” असे नारे दिले. वृक्षारोपणानंतर विद्यार्थ्यांनी पर्यावरणावर आधारित भाषणे व घोषवाक्य सादर केली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण करणारा ठरला.





















