दिघावे गावात विठूचा गजर, ज्ञानदेव-तुकाराम नावाने — संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाहुन गेला
साक्री (प्रतिनिधी) – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री यांच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून भक्तिमय आणि सांस्कृतिक वारी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वारीत शाळेतील २ री ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत, टाळ-मृदंग हाती घेत सहभाग घेतला.
दिघावे, शेणपूर, मलांजन, धाडणे येथे वारी आणि अभंगांची गूंज
विद्यार्थ्यांनी “माऊली माऊली”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल”, “ज्ञानोबा तुकाराम” अशा भक्तिगीतांमधून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाहुन टाकला. पालखीची भव्य सजावट, गावकऱ्यांनी विविध प्रकारच्या व सुंदर रांगोळ्या काढून विद्यार्थ्यांच्या वारीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. रंगीबेरंगी विठ्ठल-रुक्मिणीच्या रांगोळ्या आणि विद्यार्थ्यांनी झिम्मा फुगडी खेळत उत्साह दर्शविला. विद्यार्थ्यांच्या या झिम्मा फुगडी चा गजर वारीचे खास आकर्षण ठरले.
शेणपूर गावातील हरिभक्त पारायण भजनी मंडळ शेणपूर मलांजन गावातील हरिभक्त पारायण भजनी मंडळ मलांजन
दिघावे गावातील संत तुकाराम भजनी मंडळ व प्रतापूर गावातील संत तुकाराम भजनी मंडळ यांनीही आपला सहभाग नोंदविला आणि त्यांच्या सुंदर अशा भजनामुळे कार्यक्रमाची शोभा दुपटीने वाढली.
टाळ-मृदंगाच्या नादात, भजन-कीर्तनाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालून गेला.
उत्कृष्ट नियोजन, प्रभावी सादरीकरण
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रचिती स्कूलचे प्रफुल साळुंखे, गणेश नांद्रे आणि प्रभावती चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले. त्यांच्या नियोजनामुळे वारी सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि देखणा झाला.
मुख्याध्यापिका वैशाली लाडे, समन्वयक तुषार देवरे, वैभव सोनवणे यांच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत संस्मरणीय ठरला.
अध्यक्ष प्रशांत पाटील यांचा विशेष संदेश
संस्थेचे चेअरमन प्रशांत पाटील यांनी दूरध्वनीद्वारे विद्यार्थ्यांना आणि आयोजकांना विशेष शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “वारकरी परंपरेतून मिळणारे संस्कार आणि भक्तिभाव विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणं हीच खरी शिक्षणाची फलश्रुती आहे. प्रचितीच्या विद्यार्थ्यांनी जे वारीतून सादर केलं, ते पाहून खरंच अभिमान वाटतो. अशा उपक्रमांतून विद्यार्थी केवळ शालेय शिक्षणापुरते मर्यादित राहत नाहीत, तर आपली संस्कृती, परंपरा आणि समाज यांच्याशी जोडले जातात, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.”
दिघावे गावात विठूचा गजर, ज्ञानदेव-तुकाराम नावाने — संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालून गेला.