प्रचिती पब्लिक स्कूल येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात साजरा.
प्रचिती पब्लिक स्कूल मध्ये आज आषाढी एकादशी निमित्त पारंपारिक व भक्तीमय वातावरणात दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन आदरणीय प्रशांत पाटील साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन प्रचिती पब्लिक स्कूलच्या शिक्षका वैशाली वाघ व जागृती बिरारीस यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. “आस विठुरायाची दर्शनाची माझा विठ्ठल माझी वारी भक्तीचा लौकिक सोहळा” विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाखात सहभागी होत वारकऱ्यांप्रमाणे टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत दिंडी काढली.या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर आणि मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, चालक-मालक बंधू यांनी देखील सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आजच्या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत असलेले विद्यार्थी तसेच संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत मुक्ताबाई वेशभूषा परिधान करून आलेले विद्यार्थी आकर्षक ठरले तसेच आजच्या या आषाढी एकादशी निमित्त चिकसे या गावात दिंडी काढण्यात आली सुंदर अशी पालखीचे सजावट करण्यात आले. विठ्ठलाचे दर्शन घेत गावकऱ्यांनी सुखी राहावे याची मनोकामना केली.विद्यार्थ्यांनी रिंगण धरत पालखी भोवती विठ्ठलाचा जयघोष केला.भजनी मंडळांनी विठ्ठलाची गाणी गाऊन वातावरण आनंदी केले विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचा जयघोष करत आपली वारी पूर्ण केली तसेच आजच्या भजनी मंडळाचे श्रीफळ देऊन स्वागत केले. सरपंच व गावकऱ्यांनी सहभाग घेऊन आनंद द्विगुणीत केला विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले तसेच टाळ नृत्यही सादर केले सरिता अहिरे मॅडम यांनी आषाढी एकादशी निमित्त माहिती सांगितली.
विठ्ठलाची सुंदर अशी रांगोळी दिव्या जाधव मॅडम, प्रतीक्षा अहिरे मॅडम, प्रेरणा नांद्रे मॅडम यांनी काढले. विठ्ठलाचे फलक लेखन सायली पवार मॅडम व योजना जाधव मॅडम यांनी केले पालखी सजावट अर्चना देसले वैशाली जगताप मॅडम यांनी केले चार्ट मेकिंग व झेंडा बनवण्याचे काम अश्विनी पगार मॅडम, किरण देवरे मॅडम,सुनिता जाधव मॅडम यांनी केले लेझीम डान्स योजना जाधव, मॅडम मयुरी मॅडम वैशाली मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले टाळ नृत्य चे मार्गदर्शन प्रेरणा नांद्रे ने केले विठ्ठलाचा जयघोशाचा सराव सरिता मॅडम, किरण देवरे मॅडम यांनी केला फोटोग्राफी व व्हिडिओ मयुरी मॅडम, सायली मॅडम, प्रतीक्षा मॅडम, शितल शिंपी मॅडम यांनी केले आजच्या कार्यक्रमाची बातमी अनिता पाटील मॅडम यांनी तयार केले. त्यानंतर विठ्ठलाला प्रसाद दाखवून सर्वांनी भोजनाचा आनंद घेतला सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावकरी भजनी मंडळ यांनीही प्रसाद ग्रहण केला. अशाप्रकारे आषाढी एकादशी चा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला व विद्यार्थी आनंदाने घरी परत गेले.