प्रचिती इंटरनॅशनल स्कूल साक्री येथे लोकमान्य टिळक जयंती देशभक्तिपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी

साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती देशभक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी टिळकांच्या विचारांवर आधारित भाषणे, देशभक्तीपर गीत, आणि नाट्यछटा सादर करत त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

सूत्रसंचालन प्रभावती चौधरी मॅडम व कुणाल पानपाटील सर यांनी प्रभावीपणे केले, तर मुख्य भाषण पुजा जोहरी मॅम व वैभव जोशी सर यांनी दिले. त्यांनी टिळकांच्या स्वराज्य संकल्पनेबाबत सखोल विचार मांडले आणि विद्यार्थ्यांना प्रेरित केले. शाळेचे चेअरमन श्री. प्रशांत पाटील सर यांनी फोनद्वारे शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या सहभागाचे आणि शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या संयोजिका सौ स्मिता नेरकर मॅम व नम्रता गोसावी मॅम होत्या. प्राचार्या सौ. वैशाली लाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना टिळकांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केलं. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेली रांगोळी, भित्तीपत्रके आणि सांस्कृतिक सादरीकरण विशेष आकर्षण ठरले.
— प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज साक्री




















