प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये हेड गर्ल व हेड बॉय निवडणूक उत्साहात संपन्न

साक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, साक्री येथे हेड गर्ल व हेड बॉय निवडणूक अत्यंत उत्साहात व लोकशाही पद्धतीने पार पडली. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव व लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी या उद्देशाने या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपापल्या भूमिका, योजना व उद्दिष्टे प्रभावीपणे मांडत प्रचार केला. संपूर्ण शाळेचा परिसर निवडणुकीच्या रंगात न्हालेला दिसून आला. विशेष म्हणजे, मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक प्रणालीचा वापर करण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेतला.
प्रमुख सहभाग व आयोजन:
या निवडणुकीत सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मावशा व वाहनचालक बांधव (ड्रायव्हर भाऊ) यांनीदेखील मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला.
वोटिंग इन्चार्ज म्हणून श्री. कुणाल देवरे सर यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.शाळेचे चेअरमन श्री. प्रशांत पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना उत्तम नेतृत्वाचे महत्व पटवून देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे समन्वयक श्री. वैभव सोनवणे सर व श्री. तुषार देवरे सर यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमाचे नेतृत्व शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे मॅम यांनी केले.
विजयी उमेदवार:
प्रथम क्रमांक: वेदांत पाटील व युगंधरा ठाकरे
द्वितीय क्रमांक: दुर्वा देवरे व मयंक चव्हाण
तृतीय क्रमांक: समिक्षा चव्हाण व सार्थक चौधरी
चतुर्थ क्रमांक: निकिता देसले व गौरव भदाणे
या निवडणूक प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना नेतृत्व, संघभावना, आत्मविश्वास आणि मताधिकाराचे महत्व समजले. हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.





















