प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे Rainy Day व Blue Day उत्सवाचे मनोहारी आयोजन

पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल येथे दि. २६ जुलै २०२५ रोजी Rainy Day व Blue Day उत्साहात आणि रंगतदार वातावरणात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन आदरणीय प्रशांत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तर संपूर्ण आयोजनात शीतल मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात दिव्या मॅडम यांच्या प्रभावी सूत्रसंचालनाने झाली. आजच्या दिवशी संपूर्ण शाळा निळ्या रंगात न्हालेली होती. विद्यार्थ्यांनी निळ्या रंगाचे आकर्षक पोशाख परिधान केले होते आणि वर्गात, फलकावर, फुगे, रिबन्स आणि कागदी सजावटीद्वारे Blue Day चे सौंदर्य खुलवले होते.
🔹 Blue Day चे विशेष महत्त्व म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये निळ्या रंगांची ओळख, सौंदर्यदृष्टी, सर्जनशीलता व एकात्मता निर्माण करणे. निळा रंग हा शांततेचे, स्थिरतेचे आणि निसर्गाशी नाते असलेले प्रतिक असल्यामुळे, विद्यार्थ्यांनी निळ्या रंगाशी निगडित अनेक गोष्टी सादर केल्या.
नर्सरी, एलकेजी आणि युकेजीच्या
लहानग्यांचा खास सहभाग
या गटातील सर्व विद्यार्थी छानछान रंगीबेरंगी
रेनकोट आणि छत्र्या घेऊन शाळेत हजर होते. पावसाच्या सरींच्या वातावरणात “पावसाच्या गाण्यावर थिरकताना” त्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यांच्या नृत्याने संपूर्ण वातावरणात उत्साह निर्माण झाला. लहानग्यांचा हा निरागस सहभाग पाहून पालक, शिक्षक व इतर उपस्थितांनी भरभरून टाळ्यांनी त्यांचे कौतुक केले.
🔹 काही विद्यार्थ्यांनी पाण्याची थेंब, डॉल्फिन, फुलपाखरू, फुल, घड्याळ, पाऊस, ढग अशा निळ्या रंगाशी संबंधित सुंदर चित्रे घरी तयार करून शाळेत आणली होती. ही चित्रे वर्गांमध्ये प्रदर्शनाच्या स्वरूपात लावण्यात आली होती.
विद्यार्थ्यांना ब्लू रंगाची चॉकलेट पण वाटण्यात आली.
🔹 यामागचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रंगांच्या भावनिक व सौंदर्यात्मक पैलूंची जाणीव निर्माण करणे हाच होता.
मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांसाठी निळ्या रंगावर आधारित सुरेख कविता आणि गोष्ट सांगून कार्यक्रमात रंग भरला.
समन्वयक राहुल पाटील सर यांनी मुलांना ब्ल्यू डे विषयी माहिती दिली.
या उपक्रमात पालकांचा सहभाग उल्लेखनीय होता. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध चित्रं, वस्तू, साहित्य व कल्पनांसह सहकार्य केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
रेनी डे डान्स च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पावसाचा आनंद नृत्यातून अनुभवला. नृत्य सादरीकरण दिव्या मॅडम व योजना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
रांगोळीसाठी प्रतीक्षा मॅडम, प्रेरणा मॅडम आणि वैशाली जगताप मॅडम यांनी सुंदर रचना साकारल्या.
बॅनर सजावटीसाठी सायली मॅडम, किरण मॅडम, अर्चना मॅडम, सुनिता मॅडम, जागृती मॅडम आणि सरिता मॅडम यांनी परिश्रम घेतले.
छायाचित्रणाचे कार्य प्रतीक्षा मॅडम तर व्हिडीओ चित्रण प्रेरणा मॅडम यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.
ब्लॅकबोर्ड सजावट मयुरी मॅडम व वैशाली वाघ मॅडम यांनी केली.
बातमी लेखन सायली मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन आश्विनी मॅडम यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रम आनंददायी, शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास पोषक ठरला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत Rainy Day व Blue Day चा मनमुराद आनंद घेतला.





















