प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये ब्ल्यू डे उत्साहात साजरा


साक्री : प्रचिती प्री प्रायमरी स्कूल येथे ब्ल्यू डे मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. नर्सरी ते पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी हा विशेष दिवस आयोजित करण्यात आला होता. सर्व विद्यार्थ्यांनी निळ्या रंगाचे पोशाख परिधान करून विविध ब्ल्यू थीमवरील कृतींमध्ये सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी आकाश, समुद्र, निळी फळे, जलचर प्राणी, फुलं अशा संकल्पनांवर आधारित वेशभूषा परिधान करून आपली सर्जनशीलता दाखवली.

शाळेतील वर्गखोल्या, फलक आणि परिसर निळ्या रंगाच्या वस्तूंनी सुंदररित्या सजवण्यात आला होता. विद्यार्थ्यांसाठी निळ्या रंगाशी संबंधित गाणी, गोष्टी, चित्रकला, फॅन्सी ड्रेस, रंग ओळख यांसारख्या शैक्षणिक आणि मनोरंजक कृतींचे आयोजन करण्यात आले.
या विशेष दिवशी चेअरमन श्री. प्रशांत पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व अशा उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये रंगांविषयीची जाण, सहभागाची भावना आणि सर्जनशीलता वाढीस लागते असे सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन हिरल सोनवणे मॅम व मानसी जगदाळे मॅम यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील दोघींनी अत्यंत सुंदर पद्धतीने पार पाडले.
या कार्यक्रमाला प्राचार्य सौ. वैशाली लाडे मॅम व समन्वयक श्री वैभव सोनवणे सर,श्री तुषार देवरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचा सक्रीय सहभाग लाभला. प्रत्येक शिक्षकांनी सजावट, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, कृतींचे आयोजन व विद्यार्थ्यांच्या सहभागात मोलाची भूमिका पार पाडली. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.





















