प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये नेतृत्वाचा गौरव हेड बॉय, हेड गर्ल व हाऊस लीडर्स शपथविधी समारंभ उत्साहात पार

साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण निर्माण करण्याच्या उद्देशाने हेड बॉय, हेड गर्ल व हाऊस लीडर्स शपथविधी समारंभ अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन प्रशांत भीमराव पाटील सर उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून प्राचार्य वैशाली लाडे मॅडम व समन्वयक तुषार देवरे सर वैभव सोनवणे सर यांचीही उपस्थिती लाभली. वेदांत पाटील याची हेड बॉय म्हणून व युगंधरा ठाकरे हिची हेड गर्ल म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली चारही हाऊस लीडर्स – रेड, ब्ल्यू, ग्रीन आणि यलो हाऊसचे कॅप्टन व व्हाइस कॅप्टन यांचाही शपथविधी झाला. सर्व विद्यार्थ्यांनी जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि शाळेच्या शिस्तीचे पालन करण्याची शपथ घेतली.

चेअरमन प्रशांत पाटील सर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन:“ नेतृत्व म्हणजे केवळ पद नाही, तर ती एक वृत्ती आहे. नेतृत्व करताना प्रामाणिकपणा, शिस्त आणि इतरांसाठी आदर्श ठरणं महत्त्वाचं आहे. तुम्ही आता शाळेचे चेहरे आहात—तुमच्यातूनच इतरांना प्रेरणा मिळावी.
”प्राचार्य वैशाली लाडे मॅडम यांचे विद्यार्थीप्रेमी भाषण:“ नेतृत्वाची खरी ओळख ही संकटात होते. प्रत्येक छोट्या कृतीतून तुम्ही तुमचा दृष्टिकोन दाखवू शकता. आज तुम्ही हेड बॉय, हेड गर्ल व लीडर्स म्हणून शपथ घेत आहात, ती प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करा. ”कार्यक्रमाच संयोजन कुणाल देवरे सर, तुषार सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीतू पंजाबी मॅम यांनी केले. हा समारंभ विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि नेतृत्वगुण निर्माण करणारा महत्त्वाचा टप्पा ठरला.





















