प्राचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे रक्षाबंधन उत्सव विद्यार्थीनींनी तयार केलेल्या राखींनी कार्यक्रम गाजला
पिंपळनेर :(८ ऑगस्ट २०२५) – प्राचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे रक्षाबंधन सण विशेष कार्यक्रमात साजरा केला गेला. या कार्यक्रमाचे नियोजन आदरणीय प्रशांत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, तर संपूर्ण आयोजनात मयुरी सोनार मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले.
कार्यक्रमाला शालेय समन्वयक राहुल आहिरे सर व प्राचार्या अनीता पाटील मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या पूजनाने झाली.स्वयंम भदाणे आणि पर्व खैरणार यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रम प्रभावी बनवला. कार्यक्रमात राखी making competition आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या सुंदर अश्या राख्या शाळेत आणून प्रदर्शित केल्या. कार्यक्रमाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे प्रत्येक मुलाने मुलींसाठी गिफ्ट आणले होते, ज्यामुळे भाऊ–बहिणींच्या नात्याचा उत्साह दुपटीचा झाला. अनेक विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनावर भाषणे (speech) केली व आपल्या भावना व्यक्त केल्या. राखी मेकिंग स्पर्धा आयोजित होती आणि विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला. अनेक विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने भाषणे घेतली व कार्यक्रम अधिक भावनिक बनविला.
कार्यक्रमात प्रतिक्षा अहिरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊ बहिणीचे विशेष नृत्य सादर करण्यात आले ज्याला मोठा प्रतिसाद मिळाला. रांगोळी साठी शिक्षिका अर्चना मॅडम आणि जागृती मॅडम सुंदर रचना आकारल्या. बॅनर सजावटीसाठी सुनिता मॅडम, किरण मॅडम, शितल मॅडम, प्रेरणा मॅडम, योजना मॅडम, प्रतीक्षा मॅडम यांनी

परिश्रम घेतले. छायाचित्र योजना मॅडम यांनी केले व व्हिडिओ चित्रण वैशाली वाघ मॅडम यांनी केले. फलक सजावट सायली मॅडम आणि वैशाली जगताप मॅडम यांनी उत्कृष्ट रीतीने केले. बातमी लेखन प्रेरणा मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन वैशाली जगताप मॅडम यांनी केलेरक्षाबंधन या सणामागील भावनिक सांस्कृतिक व सामाजिक मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते कला आणि सादरीकरण कौशल यांना वाव देणे हा हेतू ठेवण्यात आला होता.

आजच्या कार्यक्रमास विशेष म्हणजे पिंपळनेर नगर परिषदेतील सफाई कामगार शिल्पा नितीन साळुंखे, रचना श्रावण वाघ, सोनी अजय गोदरे, अंजना संतोष साळुंखे, सिया दिलीप वाघ, रवींद्र मोरे या सफाई कामगारांना शाळेत बोलवण्यात आले व त्यांना राखी बांधून सत्कार करण्यात आला व शाळेतर्फे भेट देण्यात आली हे कामगार जवळजवळ 17 ते 20 वर्षांपासून पिंपळनेर नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षिका पिंपळनेर पोलीस स्टेशन व ग्रामीण रुग्णालय येथे भेट दिली व तेथील अधिकारी पोलीस उपाध्यक्ष विजय चौरे सर,पोलीस उपनिरीक्षक भूषण शेवाळे सर, पोलीस उपनिरीक्षक आय.जी. शिरसाट सर, व तेथील कर्मचाऱ्यांना राखी बांधण्यात आली.
ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर मोहणे सर, डॉक्टर राजीव पाटील सर, डॉक्टर पी पी गावित सर व डॉक्टर के पी इंदवे सर यांना सुद्धा राखी बांधण्यात आली.शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व चौकीदार यांनाही राखी बांधून सन्मान करण्यात आला. शालेय शिक्षिका अश्विनी पगार मॅडम यांनी आपल्या मनोगतात रक्षाबंधना या सणाविषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक अनिता पाटील मॅडम व शालेय समन्वय राहुल अहिरे सर यांनी मनोगत मांडून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व रक्षाबंधनाच्या पारंपरिक व सामाजिक महत्त्वावर भर दिला. आयोजने आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम आनंदी, संस्कारक्षम आणि प्रेरणादायी ठरला.





















