प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

पिंपळनेर: प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये दिनांक १९ डिसेंबर २०२५ व २० डिसेंबर २०२५ रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या क्रीडा सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडा कौशल्याचे, शिस्तीचे आणि खेळाडूपणाचे अप्रतिम दर्शन घडवले. संपूर्ण शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या आनंदाने, टाळ्यांच्या गजराने आणि जल्लोषाने दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन सोहळ्याने करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल अजमेर सौंदाणे तालुका सटाणा जिल्हा नाशिक महाराष्ट्र पब्लिक स्कूल सोसायटी अंतर्गत क्रीडा शिक्षक श्री. राजेंद्र वसंतराव ठाकरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणात क्रीडेमुळे जीवनात येणारी शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना यांचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांनी त्यांचे मनोगत पुढील प्रमाणे व्यक्त केले. मी श्री. राजेंद्र वसंतराव ठाकरे क्रीडा शिक्षक एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल अजमेर सौंदाणे तालुका सटाणा जिल्हा नाशिक महाराष्ट्र पब्लिक स्कूल सोसायटी अंतर्गत सोसायटी अंतर्गत आदिवासी विकास विभाग तसेच ट्रायबल मिनिस्ट्री भारत सरकारच्या वतीने चालवलेले एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल महाराष्ट्रामध्ये 37 आहेत पैकी सुरुवातीला चार शाळेमध्ये होत्या 1 फेब्रुवारी 2002 ला ठाणे जिल्ह्यातील बोर्डी या ठिकाणी क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत झालो तर नंतर त्याच बरोबर वस्तीगृह प्रमुख व हिंदी विषय करण्यात आले क्रीडा शिक्षक म्हणून काम करत असताना 4*400 रिले संघ नॅशनल येथे गेला होता. अनेक खेळाडू आजपर्यंत नॅशनल पर्यंत खेळले आहेत. तसेच नंदुरबार येथे कार्यरत असताना एकलव्य मॉडेल रेसिडेंट स्कूलच्या नॅशनल गेम हे हैदराबाद येथे आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये माझ्या वतीने हॉकी संघ मुले व मुली दोघेही संघ गोल्ड मेडलिस्ट राहिले त्यामुळे नंदुरबार येथील पालक मंत्र्यांनी 26 जानेवारी रोजी सत्कार केला होता तसेच सटाणा येथील रोटरी क्लब व यशवंतराव महाराज ट्रस्टच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. आपल्या पिंपळनेर येथे सहा वर्ष क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. चालू वर्षी देखील एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलच्या नॅशनल स्पर्धा ओडिसा राज्य येथे आयोजित केल्या होत्या त्यामध्ये शाळेतील सतरा खेळाडू नॅशनल मध्ये सिलेक्ट होऊन दोन गोल्ड दोन सिलवर व 10 ब्रांच मिळवली आहे.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेचे चेअरमन श्री. प्रशांत पाटील साहेब, समन्वयक राहुल पाटील सर आणि मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम यांनी केले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांचा उत्साह आणखी वाढला. क्रीडा स्पर्धेचे महत्त्व सादर करण्याची जबाबदारी अश्विनी मॅडम यांनी पार पाडली, तर अर्चना मॅडम यांनी सुंदर सूत्रसंचालन करून कार्यक्रम अधिक रंगतदार बनवला. क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने धावणे, बॉल ब्यालेन्सिंग ओन पेपर,बनी रेस, बॉटल गेम, फ्रोग जंप, स्पून विथ लेमन, टीम वर्क विथ प्लेयिंग फुटबॉल, ब्यालेंसिंग कप गेम, बॉटल अँड बलुंस गेम, लिफ्ट ब्लॅक विथ बलुंस , हाई जंप, बलून रेस, थ्रो दी बॉल इन दी बकेट, कप अँड बॉल, कलेक्ट दी बॉल, पास दी बॉल इन ग्लास, पोट्याटो रेस, कांगारू रेस, ग्लास बलेन्सिंग, बिल्डिंग पिरॅमिड, क्लेक्ट दी ग्लास, लांब उडी, गोळाफेक, अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेले मार्च पास्ट, डंबेल्स डान्स, पोम-पोम डान्स आणि पिरॅमिड फॉर्मेशन हे कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष आकर्षणाचे ठरले. सरिता मॅडम यांच्या नेतृत्वाखाली केलेला मार्च पास्ट डान्स उत्कृष्टरित्या सादर झाला. मयुरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेला डंबेल्स डान्स प्रेक्षकांच्या टाळ्यांचा वर्षाव मिळवून गेला, तर सायली मॅडम यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला पिरॅमिड कार्यक्रम अत्यंत कौशल्यपूर्ण ठरला. दिव्या मॅडम यांच्या नेतृत्वाखाली झालेला पोम-पोम डान्स संपूर्ण वातावरण अधिक रंगतदार करून गेला.
कार्यक्रमातील प्रेरणा मॅडम यांनी घेतलेली शपथविधी (Oath Taking) हा घटक विशेष लक्षवेधी ठरला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास आणि शिस्त खरोखर प्रेरणादायी होती. तसेच कार्यक्रमात दाखविण्यात आलेला मशाल धाव (Torch Run) व्हिडिओ —मयुरी मॅडम,सीमा मॅडम आणि शितल मॅडम यांनी तयार केला तसेच संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ जागृती मॅडम यांनी तयार केला. विद्यार्थ्यांना प्रचंड प्रेरणादायी ठरला. फोटो व्यवस्थापनाची जबाबदारी वैशाली जगताप मॅडम यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली, तर आकर्षक रांगोळ्यांनी मैदानाची शोभा वाढवण्याचे कार्य प्रेरणा मॅडम, सरिता मॅडम आणि किरण मॅडम यांनी केले. तसेच स्वागत रांगोळी आणि मशाल रांगोळी सुनीता मॅडम, लीना मॅडम, दिव्या मॅडम आणि सीमा मॅडम यांनी पार पाडली. तसेच बॅनर थिंग्ज मध्ये वैशाली मॅडम, सायली मॅडम, शितल मॅडम,मयुरी मॅडम, जागृती मॅडम आणि दिव्या मॅडम यांनी केले. तसेच मैदानाची सजावट आणि व्यवस्था समाधान काका व मावशींनी समर्थपणे केली.
दुसऱ्या दिवशी विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभात प्रमाणपत्रे व मेडल्स देऊन गौरविण्यात आले. या समारंभात मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि उत्कृष्ट कामगिरीचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन आणि देखरेख योजना मॅडम आणि प्रतीक्षा मॅडम यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडली.
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने झाली. समारोपाच्या वेळी मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “क्रीडा ही केवळ स्पर्धा नाही, तर आत्मशिस्त, संघभावना आणि सकारात्मक विचारांची शाळा आहे.” त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी संपूर्ण वातावरणात उत्साह आणि अभिमानाची भावना निर्माण झाली. तसेच शाळेचे समन्वयक यांनी त्यांचे मनोगत पुढील प्रमाणे व्यक्त केले स्पिरीट हे केवळ शरीराने नसून मनाने देखील असायला हवे.स्पर्धा म्हणजे केवळ जिंकणे वा हारणे नव्हे, तर शिकण्याची आणि स्वतःला घडवण्याची संधी आहे. पराभव आपल्याला सुधारण्याची शिकवण देतो, तर विजय आत्मविश्वास वाढवतो. हारल्यानंतरही नव्या जोमाने प्रयत्न करणे हेच खरे यश आहे.
प्रचिती पब्लिक स्कूलचा हा वार्षिक क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि स्पर्धात्मकता वाढवणारा ठरला. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचे परिश्रम आणि पालकांचा सहकार्यभाव यामुळे हा क्रीडा महोत्सव खरोखरच संस्मरणीय ठरला.


















