प्रचिती इंटरनॅशनल शाळेत क्रीडा दिन जल्लोषात साजरा
उत्साह, शिस्त आणि क्रीडाभावनेचा संगम




साक्री : शाळेत वार्षिक क्रीडा दिन अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या भव्य कार्यक्रमाचे इन्चार्ज प्रभावती चौधरी व श्री. कुणाल पान पाटील व श्री. कुणाल देवरे यांनी नियोजनबद्ध व प्रभावी अंमलबजावणी करून कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शाळेचे चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रेरणादायी व मार्गदर्शक संबोधन केले. क्रीडा हे व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वाचे साधन असून शिस्त, संघभावना व आत्मविश्वास घडवते, असे त्यांनी नमूद केले.
प्राचार्या वैशाली लाडे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक प्रभावी व शिस्तबद्ध ठरला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रसाद रोंदळ पोलीस उपनिरीक्षक साक्री यांच्या आगमनाने कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली. कार्यक्रमाचे समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांनी वेळेचे काटेकोर नियोजन व योग्य मार्गदर्शन करून कार्यक्रम यशस्वी केला. क्रीडा शिक्षक श्री. कुणाल देवरे व श्री. वैभव सोनवणे यांनी सर्व क्रीडा स्पर्धांचे उत्कृष्ट नियोजन करून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना रुजवली.
मैदानावरील सुंदर सजावट व आकर्षक डेकोरेशनमुळे कार्यक्रमाची भव्यता अधिक वाढली. रंगीबेरंगी रांगोळी प्रियंका पवार व सविता लाडे यांनी रेखाटली. कार्यक्रमात नृत्य सादरीकरण श्रीमती सपना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवी च्या विद्यार्थिनींनी सादर केले. मार्चपास्ट श्री. तुषार सूर्यवंशी व कुणाल देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. सूत्रसंचालन सौ. नितु पंजाबी यांनी उत्तम रित्या पार पाडले. तर क्रीडा दिनाची सविस्तर माहिती श्री. राजरत्न सोनवणे यांनी प्रभावीपणे सादर केली. या क्रीडा दिनाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये जोशात सहभाग घेतला.
संपूर्ण कार्यक्रम उत्साह, आनंद व क्रीडाभावनेचा अविस्मरणीय सोहळा ठरला.


















