प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे गणित दिन उत्साहात साजरा

साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महान गणितज्ज्ञ डॉ. श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबद्दल गोडी निर्माण करणे व तार्किक विचारसरणी विकसित करणे हा होता.
कार्यक्रमाचे इन्चार्ज श्री. धर्मराज अहिरे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वैभव जोशी यांनी प्रभावी व उत्साहपूर्ण पद्धतीने केले. शाळेचे संस्थापक चेअरमन आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना गणित विषयात प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांची उपस्थिती लाभली. यावेळी विद्यार्थ्यांनी गणितीय कोडी, प्रश्नमंजुषा, सूत्रांचे चार्ट, गणिती खेळ व विविध सादरीकरणे सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. सर्व गणित विषय शिक्षकांनी एकत्रितपणे परिश्रम घेऊन हा कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या पार पाडला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले व गणित विषयाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित करण्यात आले.


















