प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे
शाळेत “ख्रिसमस डे” उत्साहात साजरा

साकी : शाळेत ख्रिसमस डे उत्साहात साजरा शाळेत ख्रिसमस डे मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. स्मिता नेरकर व श्रीमती नम्रता गोसावी यांनी कार्यक्रम संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळली.
या प्रसंगी शाळेचे चेअरमन आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांना क्रिसमस सणाबद्दल माहिती सांगितली.
शाळेचे समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांनी या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. कुणाल पानपाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी ख्रिसमसच्या शुभेच्छा देत विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. श्री. प्रशांत ससले यांनी सांताक्लॉजच्या रूपात विद्यार्थ्यांना गोड भेटवस्तू देऊन आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनींच्या हस्ते केक कापण्यात आला. कार्यक्रमातील क्षणचित्रे टिपण्याची जबाबदारी श्रीमती सपना ठाकरे यांनी सांभाळली, तर व्हिडिओ चित्रीकरण श्रीमती अश्विनी ठाकरे यांनी केले.
फलकावर आकर्षक सजावट श्री. जितेंद्र कासार यांनी केली. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व आनंदी वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, आपुलकी व सामाजिक एकोप्याची भावना निर्माण झाली.


















