प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे नाताळ सण
मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजर

पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी नाताळ सण मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेचे संस्थापक प्रशांत भीमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचिती पब्लिक स्कूल मध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून संस्थेचे समन्वयक राहुल अहिरे सर आणि प्रिन्सिपल अनिता पाटील मॅडम उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मयुरी मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात सांताक्लॉजच्या आगमनाने झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन अश्विनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेश खैरनार व सिया हसानी या विद्यार्थ्यांनी केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादरीकरण केले. विशेषतः एल.के.जी. वर्गातील विद्यार्थ्यांचे नृत्य उपस्थितांचे मन जिंकून गेले. नाताळच्या निमित्ताने शाळेचे फलक सजावट दिव्या मॅडम व सुनिता मॅडम यांनी केली. सुंदरशी रांगोळी अर्चना मॅडम, प्रतीक्षा मॅडम आणि जागृती मॅडम यांनी काढली. बॅनर्स थिंग्समध्ये प्रेरणा मॅडम,शितल मॅडम वैशाली मॅडम,सायली मॅडम योजना मॅडम,प्रतीक्षा मॅडम सरिता मॅडम यांनी केले. सांताक्लॉज येताच विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. सांताक्लॉज ने सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू, कॅडबरीचे वाटप केलेसांता क्लॉज ची भूमिका युकेजी चा आयान हिरे आणि आठवी च्या वर्गातील चैतन्य बच्छाव या विद्यार्थ्यांनी बजावली. त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत केक कटिंगचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे छायाचित्रण सायली मॅडम, तर व्हिडिओ चित्रीकरण योजना मॅडम यांनी केली. कार्यक्रमाची माहिती प्रेरणा मॅडम यांनी दिली. कार्यक्रमाच्या शेवटी दिव्या मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
संपूर्ण कार्यक्रमाच्या बातमीचे लेखन शितल मॅडम यांनी केले. अशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱी यांचे मोलाचे योगदान लाभले. हा नाताळ चा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व संस्मरणीय ठरली.


















