पिंपरी – पिंपरी विधानसभा मतदारसंघात आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आयोजित केलेल्या “प्रथम ती” या महिला सशक्तीकरण व सक्षमीकरण कार्यक्रमाला महिलांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला आहे.
शहर शिवसेनेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये आमदार डॉ. मनिषा कायंदे, वीणा भागवत आदींनी पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्रातील महिलांना शिक्षण, सुरक्षा, समता, स्वास्थ्य आणि स्वावलंबन याविषयी मार्गदर्शन करून उपस्थित महिलांची मने जिंकली. या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे यांसह शिवसेनेचे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.