पिंपरी : अण्णासाहेब मगर सहकारी बॅंकेच्या सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष प्रा. राजेश सस्ते यांनी दिली. अंकुशराव लांडगे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या २० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सस्ते यांनी जाहीर केले.
प्रा. सस्ते म्हणाले की, सहकारी बॅंकिंग क्षेत्रामध्ये चढाओढ व स्पर्धा निर्माण होणे हे अपरिहार्य आहे. एका सहकारी बॅंकेचा ग्राहक काही वर्षांनी दुसऱ्या बॅंकेत जाणे याचा अर्थ संबंधित बॅंकेकडून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. तसेच ग्राहकाच्या सर्वच अपेक्षा संबंधित बॅंक पूर्ण करु शकत नाही. यासाठी आपल्या बॅंकेचे कोणतेही कामकाज सांभाळत असताना आपला प्रत्येक प्रयत्न हा स्पर्धात्मक व सकारात्मक वृत्तीनेच होणे अपेक्षित आहे.
यावेळी उपाध्यक्ष मनोज बोरसे, ऍड. घनशाम खलाटे, सुलोचना भोवरे, गणेश पवळे, विजय गवारे, सोनल लांडगे, दीपक डोळस, तज्ञसंचालक ऍड. बाळासाहेब थोपटे, सी.ए.अमेय दर्वे, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन कुलकर्णी, नंदकुमार लांडे, शंकरराव पांढरकर, आनंदा यादव, शामराव लांडगे, संतोष धर्मावत, सदाशिव बोराडे, बाळासाहेब लांडे, भाऊसाहेब कोकाटे आदी उपस्थित होते. संचालिका सुलोचना भोवरे यांनी आभार मानले.