चिंचवड : अग्रवाल समाजाचे कुलपिता, सत्य, अहिंसा आणि समाजवादचे प्रणेता महाराजा श्री अग्रसेन यांच्या जन्मोत्सवानिमित्त चिंचवड प्राधिकरण अग्रवाल समाज ट्रस्टच्या वतीने अग्रसेन जयंती महोत्सवाचे आयोजन चिंचवड येथील अग्रसेन भवन येथे करण्यात आले आहे. 26 सप्टेंबरपासून 4 ऑक्टोंबरपर्यंत विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमा सोबत महिला व लहान मुलांसाठी विविध स्पर्धा होणार आहे. तसेच, श्री अग्रसेन ट्रस्टच्या वतीने अनेक रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती अध्यक्ष भीमसेन अग्रवाल यांनी दिली.
२९ रोजी भव्य शोभा यात्रा…
तुळजाभवानी मंदिर येथून 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता श्री अग्रसेन महाराज यांची भव्य शोभा यात्रा चिंचवडच्या अग्रसेन भवन पर्यंत काढण्यात येणार आहे. यानंतर भवनध्ये महालक्ष्मीची महाआरतीचे आयोजन केले आहे. यावेळी एडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस महाराष्ट्र राज्य संजीवकुमार सिंघल आणि मित्तल गु्रपचे नरेश मित्तल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी हुशार विद्यार्थ्यांचा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. 04 ऑक्टोंबर रोजी माँ भगवतीची भव्य माता की चौकीचे भजनगायक नरेश सैनी, रमेश ओबेरॉय, अंजली सागर और मुकेश गोयल प्रस्तुत करतील. यावेळी अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.