पिंपरी:- कामगारांचे प्रश्न, आव्हाने यावर चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना, शिवगर्जना कामगार संघटनेच्या वतीने पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, रांजणगाव या औद्योगिक पट्ट्यातील कामगार, कामगार प्रतिनिधींच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भोसरी येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात रविवारी (दि. २९) सकाळी ११.०० वाजता हा मेळावा होणार आहे. आमदार महेश लांडगे कामगारांना मार्गदर्शन करणार आहेत. शहर भाजप कामगार आघाडीचे प्रकाश मुगडे, भाजपच्या कामगार आघाडीचे सचिव हनुमंत लांडगे, विष्णूपंत नेवाळे, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष जीवन यळवंडे, उपाध्यक्ष शाम सुळके, शिवगर्जाना कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष बेंद्रे, सल्लागार रोहीदास गाडे, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे उपाध्यक्ष किसन बावकर, टाटा मोटर्स कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन लांडगे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.