• पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे आरोग्य बिघडल्याचे महापालिकेच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालातून स्पष्ट झाले असून, वाढते औद्योगिकीकरण हे प्रदूषणाचे प्रमुख कारण असून, वाढती वाहनसंख्या, अनियंत्रित बांधकामे, रस्त्यावरील धुरळ्यामुळे वायुप्रदूषण वाढले असून, श्वसनाचे आजार वाढले आहेत. तसेच सण-उत्सवांच्या निमित्ताने ध्वनिप्रदूषणात आणि नद्याच्या प्रदूषणातही वाढ झाल्याचा निष्कर्ष पर्यावरण अहवालात काढला आहे. उपाययोजनांचा पाऊस अहवालातून पडला आहे.

  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल तयार करण्यात येतो. या वर्षी मुदत संपून गेल्यानंतरही हा अहवाल अद्यापही जनतेसाठी खुला केलेला नाही. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. मात्र, पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने अहवालावर चर्चा झालेली नाही. गेल्या वर्षी नगरसेविका सीमा सावळे आणि भाजपाचे नेते सारंग कामतेकर यांनी पर्यावरण अहवालाचा पोलखोल केला होता. आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाढत्या प्रदूषणाविषयी आणि पर्यावरण विभागाच्या अकार्यक्षमतेविषयी नाराजी व्यक्त केली होती. ‘पर्यावरण दुर्दशा अहवाल’ तयार करून पर्यावरण विभागाच्या अकार्यक्षमतेची लक्तरे पालिकेच्या वेशीवर टांगली होती. पुराव्यासह महापालिकेचा अहवाल किती बोगस आहे, हे पटवून दिले होते. त्यानंतर पर्यावरण विभागास काही प्रमाणात जाग आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात हा अहवाल सुसूत्रपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. संशोधन प्रबंधाप्रमाणे मांडणी केली आहे. २०१५-१६ या वर्षीच्या अहवालात हवा, पाणी आणि ध्वनिप्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. उद्योगनगरी म्हणून लौकिक मिळविलेल्या

  पिंपरी-चिंचवडचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे सेवासुविधांवर ताण येत आहे. हवा, पाणी आणि ध्वनिप्रदूषणामुळे प्रतिकारशक्ती कमी होत असल्याचा निष्कर्षही काढण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

  श्वसनाचे रुग्ण वाढले

  पिंपरी, मोशी, रावेत, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, चिखली, भोसरी परिसरातील वायुप्रदूषणाची निरीक्षणे नोंदविली. सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकणांची पातळी मानांकापेक्षा जास्त असल्याने पिंपरी, पिंपळे निलख, भोसरी, मोशी, वाकडमधील हवा अधिक प्रदूषित आहे. त्यामुळे खोकला, दमा, क्षयरोग, छातीत दुखणे, ब्रोंकॉयटिससारखे श्वसनाचे विकार वाढत आहेत. आकडेवारीचा आलेख पाहिल्यास २०१३-१४ मध्ये ६१ हजार ६२० व २०१४-१५ मध्ये ६१ हजार ८६२ रुग्णांना श्वसनाचे आजार वाढले आहेत. दोन वर्षांच्या तुलनेत ४२ रुग्ण वाढले आहेत.

  जीवन धोक्यात

  विशेषत: सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकणांची

  पातळी मानांकापेक्षा जास्त असल्याने पिंपरी,

  पिंपळे निलख, भोसरी, मोशी, वाकडमधील हवा सर्वाधिक प्रदूषित आहे. या प्रदूषित हवेमुळे २०१४-१५ मध्ये ६१ हजार ८६२, तर सन २०१५-१६ मध्ये ७८ हजार ८५९ नागरिकांना श्वसनसंस्थेचे आजार झाल्याचे अहवालात नमूद केले आहेत. परिणामी अशा रुग्णांची प्रतिकारशक्तीही खालावली आहे, असे नमूद केले आहे. निगडी, पॉलिग्रास मैदान येथील बसविलेल्या एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन यंत्रणेचा वापर केला आहे.

  भोसरी आणि निगडीतील रहिवासी-औद्योगिक क्षेत्राचा अभ्यास करण्यात आला. या दोन्ही ठिकाणी सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण निर्धारित मानांकापेक्षा जास्त असल्याचे आढळून आले; तर पिंपरी-चिंचवड महापालिका भवन आणि मराठा चेंबर आॅफ कॉमर्स इमारतीच्या गच्चीवर वर्षभर केलेल्या पाहणीत नायट्रोजन डायआॅक्साईडची पातळी जास्त असल्याचे आढळून आले. मानवी आरोग्यावर आणि इतर जैवविविधतेवरही परिणाम होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here