नवी दिल्ली : इंडोनेशिया मास्टर्स ग्रां. प्री. गोल्डमध्ये सहभागी होण्यास चाललेल्या एच एस प्रणयसह अन्य भारतीय बॅडमिंटनपटूंना मलेशियन विमान कंपनीच्या सावळ्या गोंधळामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. यामुळे त्यांच्या सामन्यांवर परिणाम होणार नाही ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.
प्रणय सोबत साईप्रणित, पीसी तुलसी सिरिल वर्मा आणि रुथविका शिवानी यांनी हैदराबादहून क्वालालम्पूर येथे जाण्यासाठी आज पहाटेच्या एमएच 0१९९ या विमानात तिकीट बुकिंग केले होते. परंतु हे विमान खूपच उशिरा उडाले, त्यामुळे
या खेळाडूंच्या पुढील विमानप्रवासाचा बोजवारा उडाला. गा गोंधळामुळे
या खेळाडूंची मलेशियातील जाकार्ताहून स्पर्धा होणाऱ्या बालीकपापन शहरात जाणारी कनेक्टिंग फ्लाईट चुकली.
प्रणयने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मलेशिया एअरलाईन्सने आमच्या योजनेवर पाणी ओतले. आमची हैदराबाद-क्वालालम्पूर फ्लाईट उशिरा आली. त्यामुळे जाकार्ताला जाणारी पुढील कनेक्टिंग फ्लाईट चुकली. त्यांनी आमची दुसऱ्या विमानात सोय केली परंतु त्यालासुध्दा तीन तास उशिर झाला. आता आम्हाला रात्रीच्या विमानाचे दहा हजार रुपये भरुन तिकीट घ्यावे लागले. मलेशियन एअरलाईन्सकडून
अद्याप कोणताही परतावा मिळालेला नाही. आता आम्ही जाकार्ता विमानतळावर वेटिंग करीत असून
उद्या सकाळीच आम्ही बालीकपापनला पोहचू. (वृत्तसंस्था)
>७ सप्टेंबरला सामने असल्याने बचावलो…
ही स्पर्धा सहा सप्टेंबरला सुरु होणार असून भारतीय खेळाडूंचे सामने सात तारखेपासून सुरु होत आहेत. २0१४ साली इंडोनेशियन मास्टर्स स्पर्धा जिंकणारा प्रणय म्हणाला, आमचे सामने सात सप्टेंबरला होणार असल्यामुळे आम्ही बचावलो, जर ६ तारखेला असते तर आम्हाला सामना सोडावा लागला असता.