पुण्यात पूर्वी नाटकांना चोखंदळ प्रेक्षक होता. नाटक पाहण्यासाठी अमुक एक बुद्धिमत्ता असलेला प्रेक्षक यायचा. आता प्रेक्षकांची अभिरुची खालावली आहे. अनेकजण नटीचे चेहरे पाहून आणि “हॉटेलिंग‘ला जावे तसे नाटकाला येतात. तमाशाचा असावा तसा नाटकाचा प्रेक्षक बनला आहे,‘‘ असे विधान करत नाटककार रत्नाकर मतकरी यांनी सोमवारी पुण्यातील प्रेक्षकांवर जोरदार टीका केली.
खरोखरीच पुण्यातल्या प्रेक्षकांचा दर्जा खालावला आहे का? दर्जा खालावला असेल तर “दोन स्पेशल‘, “वाडा चिरेबंदी‘, “मग्न तळ्याकाठी‘, “अमर फोटो स्टुडिओ‘ यासह अलीकडच्या अनेक नाटकांना प्रेक्षकांची इतकी गर्दी झाली असती का? प्रेक्षकांची दाद मिळतेय म्हणूनच या नाटकांचे प्रयोग सातत्याने होत असतील ना? जुनी नाटके नव्याने रंगभूमीवर आणण्याचे धाडस कोणी केले असते का? लोककला जिवंत राहावी म्हणत असताना तमाशाच्या प्रेक्षकांना कमी लेखणे आणि प्रेक्षकांमध्ये भेदभाव करणे योग्य आहे का? चांगले प्रेक्षक नसते तर नवी पिढी आज रंगभूमीवर धडपडत राहिली असती का?… असे वेगवेगळे प्रश्न यानिमित्ताने मनात येत आहेत. तुम्हाला काय वाटते?