पिंपरी :- पिंपरी युवासेना व शिवसेना शाखा फुगेवाडीच्या वतीने आज विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करत बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवहारलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशभर बालदिन साजरा होतो. त्याच निमित्ताने पिंपरी युवासेना व शिवसेना शाखा फुगेवाडीच्या वतीने येथे लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा फुगेवाडीच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी युवासेनेचे विभाग निलेश हाके, प्रभाकर हिंगे, बाबू बापूर, प्रमोद शिंदे,अविनाश जाधव, विकास गायकवाड, शैलेश हाके, चिंचपा निंगडोळे, मनोज काची, सुनील कांबळे उपस्थित होते.