सेंट उर्सुला स्कूल निगडी येथे इयत्ता दहावीत असताना, इनोव्हेटिव्ह स्टेप्लर पीन्स.चा शोध लावला, त्याचे पेटंट घेतले संपूर्ण भारतामधून आलेल्या 4156 प्रकल्पातून निवडक 22 प्रकल्पामधून महाराष्ट्रातील एकमेव अंकिता नगरकर हिच्या प्रकल्पाची निवड झाली होती.त्यासाठी तिला दि. 15 ऑक्टोबर 2011 रोजी म्हणजे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या वाढदिवशी ‘नॅशनल ईग्नाइट’ अ‍ॅवार्ड जाहीर झाले होते.
दि. 11 नोव्हेंबर 2011 हा जादुई दिवस म्हाळसाकांत कॉलेज येथे अकरावीत शिकत असणार्‍या अंकिताच्या स्वप्नांना प्रत्यक्ष आकार देणारा, साकारणारा होता. कारण याच दिवशी अंकिता नगरकरचा सत्कार समारंभ अहमदाबाद येथील खखच येथे माजी राष्ट्रपती थोर संशोधक अब्दुल कलाम यांच्या हस्ते झाला. मी अंकिता बरोबर या कार्यक्रमासाठी गेले. त्या समारंभाची मी प्रत्यक्षदर्शी अनुभूती घेतली. दुपारी 3 वाजता आयआयएम अहमदाबाद येथे मुख्य बक्षीस समारंभ सुरू होणार होता. त्यापूर्वी निवड झालेल्या प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित केले होते. पटांगणाच्या आवारात आयआयएमचे डॉ. अनिल गुप्ता हे डॉ. अब्दुल कलाम यांना घेऊन आले.कलामसर प्रत्येक प्रकल्प बारकाईने पहात होते. विद्यार्थ्यांची संवाद साधत होते. ते अंकिताच्या प्रकल्पाजवळ आले. तिचा प्रकल्प लहान, सुटसुटीत व सर्वात कमी खर्चाचा होता. तिने स्टेपलरच्या शेवटच्या काही पिनांना रंगविले व त्यामुळे पिना संपायला आल्यावर आधीच कळणार ही तिची संकल्पना ऐकून घेतल्यावर स्टेप्लर आणि रंगविलेल्या पिना हातामध्ये घेऊन तिच्याकडे कुतुहलाने पाहून त्यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली.
एुलशश्रश्रशपीं लेपलशिीं, र्ींशीू पळलश, हळसहश्रू र्ीीशर्षीश्र . ख श्रळज्ञश र्ूेीी श्ररींशीरश्र ुरू ेष ींहळपज्ञळपस. र्धेी लरप रश्रीे ीीूं ीें वर्शींशश्रेि ीींरश्रिशी ुहळलह लरप लश शरीू ीें हरपवश्रश अंत्यत समाधानाने त्यांनी कौतुकाने तिची पाठ थोपटली आणि त्या परीसस्पर्शाने अंकिताच्या अंगात एक चैतन्यमय उत्साहाची वीज चमकली.ते तिचे आदर्श होते, त्यांच्या महानतेच्या गोष्टींनी ती भारावून गेली, त्यांच्या कतृत्वाने दिपून गेली होती.
ते प्रत्यक्ष अब्दुल कलामसर तिच्या समोर होते. तिचे कौतुक करत होते. तिला हे सारे स्वप्नवत वाटत होते. कलामसरांच्या सहवासातील सुसंवादाच्या भारावलेला त्या दोन तासाच्या काळात अंकिताच्या व्यक्तिमत्वात आणि अतंःकरणात कमालीचा बदल घडत होता. आता इयत्ता दहावीची महाराष्ट्रातील कु. अंकिता नगरकर ‘इनोव्हेटिव्ह स्टेप्लर पीन’ यासाठी सन्मानित होत आहे, असे निवेदन केले गेले. अंकिता स्टेजवर मोठ्या धीराने आणि निश्‍चयाने गेली. तिने प्रथम कलामसरांशी हस्तांदोलन केले नंतर तिचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मी माझ्या अतंःकरणाच्या कॅमेरात तो प्रसंग बंदिस्त केला. कलामसरांचा सहवास, सुसंवाद, त्यांचे जीवनाचा मंत्र देणारे भाषण त्यांनी दिलेली शाबासकी, या परीस स्पर्शाने अंकिताचे जीवन सुवर्णमय झाले.
तिच्यामध्ये अमुलाग्र बदल झाला. त्याप्रसंगाने तिचा भीडस्त स्वाभाव नाहिसा होऊन एक निश्‍चयी, धेय्यवेडी आणि धाडसी अंकिताला मी पहात होते. पुण्यामध्ये परत आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वृत्तपत्रांनी तिच्या कार्याला मनापासून प्रसिध्दी दिली. तिचे अनेक शाळा, कॉलेज नामांकित कंपनी येथे सत्कार व सेमीनार झाले. शरद पवार, लष्करप्रमुख दिलावरसिंह, डायरेक्टर आयआयटी मुबंई, डायरेक्टर एचईएमआरएल यांच्या हस्ते सत्कार झाले. नामांकित कंपन्या एस्सार, एफसीसीआय, डीपेक्स, थ्रीसेन ग्र्ाुप, ली मेरिडियन येथील आईईई सेमीनार इत्यादी अनेक ठिकाणी तिला खास आमंत्रित व्याख्यानासाठी आमंत्रित केले जात आहे. लहान वयातच बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणी म्हणून काही संस्था मध्ये ती उपस्थित राहिली आहे. विज्ञानदिनानिमित्त पुणे आकाशवाणीवर, युववाणीमध्ये तिची खास मुलाखत प्रसारित करण्यात आली. झी क्यू चॅनेलवर ‘टिनोव्हिजन’ या कार्यक्रमात एक संपूर्ण भाग तिच्यावर चित्रित करण्यात आला. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिच्या कार्याची नोंद घेण्यात आली. एक अबोल अंकिता त्या परीसस्पर्शाने एक समर्थ वक्ता व ज्युनियर सायंटिस्ट बनली. कलामसरांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन तिला एक नवी संशोधक दृष्टी व देशासाठी सक्रिय कार्य करण्याची ऊर्जा मिळाली. अंकिताचे वडील डीआरडीओ, पुणे येथे शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या प्रोत्साहानाने एका पाठोपाठ एक असे पाच समाजोपयोगी शोध लावून पेटंट तिने फाईल केली. त्यातील आधुनिक पेट्रोलपंपाचा शोध विशेष गाजला. ती सध्या शाहू इंजिनियरिंग कॉलेज ताथवडे येथे कॉम्प्यूटर इजिनियरिंगमध्ये शिकत आहे.आपल्या मित्रपरिवाराला तिने पेंटटसाठी प्रोत्साहित केले व मदत केली. विविध एनएसएस शिबिर, समाज सेवी संस्था, सकाळ समूहाने चालविलेल्या यंग इन्स्पिरेशन नेटवर्क (यीन) यामध्ये ती नेतृत्व करू लागली. महिन्यातून एकदा आदिवासी आश्रमशाळांमध्ये भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना ती मार्गदर्शन व मदत करीत आहे. समाजकार्यात सक्रिय होऊन आनंद देतघेत आहे. अंकितासारखे अनेक बालसंशोधक केवळ मार्गदर्शनाअभावी भारतवर्षामध्ये पुढे येऊ शकत नाही हा विचार मनामध्ये आल्यामुळे मी, माझ्या अकिंताचा शोध. हे पुस्तक लिहिलेले आहे. सकाळ वृत्तपत्रामध्ये आलेल्या परीक्षणामुळे अल्पावधीतच त्याच्या 10 हजार प्रती विकल्या गेल्या. यामध्ये असणार्‍या शोध आणि पेटंटची माहिती घेऊन प्रत्यकांनी आपली कल्पाना प्रत्यक्षात उतरविली पाहिजे. मला या पृथ्वीतलावर अदृश्य असलेला तो परीसस्पर्श खरोखरीच कलामसरांच्या रूपाने दृश्य स्वरूपात दिसला. आज त्यांच्या जन्मदिनी मनापासून म्हणावेसे वाटते.
‘हरकदम पे इम्तेहान लेती है जिदंगी, हरकदम पे शिकस्त देती है जिदंगी, हम जिंदगीसे शिकवाँ कैसे करे क्योंकी कलामसर जैसे लोग भी मिला देती है जिंदगी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here