Chaupher News

कडकनाथ कोंबडी संस्थेशी आपला कोणताही संबंधित नाही. मला राजकारणातून संपवण्याच्या उद्देशाने आंदोलन करण्यात येत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे ते बोलत होते.

कडकनाथ घोटाळ्यावरून आरोप होत असल्याने माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानाचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर आज टीकेची झोड उठवली. त्यावर खोत म्हणाले की, काही स्वकीय आणि परकीय हितचिंतक हे सातत्याने मैदानात लढण्याऐवजी वेगवेगळ्या मार्गाने मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

शिखर बँक प्रकरणात आणि साखर कारखाने विक्री प्रकरणात राजू शेट्टी हे मॅनेज झाले, शेट्टी हे अनेकवेळा दिशाभूल करून अनेक वेळा सेटलमेंट केल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अन्य शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. यामध्ये रयत ऍग्रो कंपनीने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात रयत ऍग्रो कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here