Chaupher News

शहरातील एका नामांकित डॉक्टरला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पाऊण कोटी रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मनोज अडसूळ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पर्वती भागातील एका डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणातील तक्रारदार डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर आहे. त्याच्या विरोधात ऑक्टोबर २०१९ मध्ये एका महिलेने विनयभंगाची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेली होती. या प्रकरणात तुमच्या मुलाविरोधात बलात्कार तसेच जातीवाचक शिवीगाळ करणे (अ‍ॅट्रोसिटी) असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊ शकतात, अशी धमकी अडसूळने तक्रारदार डॉक्टरांना दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here