Chaupher News
पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वीची परीक्षा आज (18 फेब्रुवारी) पासून सुरुवात झाली. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून 15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. 18 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी 9 विभागीय मंडळातून एकूण 15 लाख 05 हजार 027 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात 8 लाख 43 हजार 552 विद्यार्थी तर 6 लाख 61 हजार 325 विद्यार्थिनी आहेत. या परीक्षेसाठी विज्ञान शाखेतील 5 लाख 85 हजार 736 विद्यार्थी, कला शाखेतून 4 लाख 75 हजार 134 विद्यार्थी, वाणिज्य शाखेतून 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे 57 हजार 373 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी 9 हजार 923 कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर संपूर्ण राज्यात 3 हजार 036 परीक्षा केंद्र आहेत.