Chaupher News
नवी दिल्ली : मोदी कोणतंही सोशल मीडिया अकाउंट बंद करणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. रविवारी 8 मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्ताने पीएम मोदी ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम महिला चालवणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, मी अशा महिलांना सोशल मीडिया वापरायला देणार आहे, ज्यांच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते.’
पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे की, ‘या महिला दिवसाच्या निमित्ताने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सची कमान त्या महिलांच्या हाती देणार आहे, ज्यांनी आपल्या आयुष्याने आणि कामाने आपल्याला प्रेरित केलं आहे. यामुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळणार आहे. तुमची कहानी अशी आहे का? तुम्ही अशा महिलांना ओळखता का? #SheInspiresUs हा हॅशठॅग वापरून अशा महिलांची कहाणी शेअर करा.’