Chaupher News
येस बँकेवर कर्जाचा बोजा वाढला वाढल्यामुळे RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. तसेच ग्राहकांना खात्यातून ५० हजार रुपयेच काढता येतील असंही RBI नं म्हटलं आहे.
५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास खातेदारांना RBI ची मंजुरी घ्यावी लागणार आहे. खातेदारांना वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्न या तीन कारणांसाठीच ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येईल. मात्र RBI ची मंजुरी त्यासाठी घेणं बंधनकारक असणार आहे.