Chaupher News

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त संततुकाराम नगर येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळयास महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके व स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगरसदस्य योगेश बहल, श्री. संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदु कदम, कुमार कोणकर, माणिक आहिरराव, सुभाष कोळी, हरीभाऊ करमळकर, शंकर शिंदे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी उपस्थित होते. तसेच, भक्ती शक्ती येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळयासही महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके व स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्य अमित गावडे, प्रा. उत्तम केंदळे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुमन पवळे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम. एम. शिंदे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here