Chaupher News
पुणे : कोरोना विषाणू बाधित किंवा संशयित रुग्ण हा काही गुन्हेगार नाही. त्यांची ओळख माध्यमांनी किंवा नागरिकांनी जाहीर करु नये. कारण त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जाण्याची भीती आहे. त्यामुळे तेवढी काळजी माध्यमांनीही घ्यावी, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केले.
पुण्यात ५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, पुण्यात १७ जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील ५ पॉझिटिव्ह आहेत. १० जणांच्या अहवालाची आम्ही वाट पाहत आहोत, असे त्यांनी म्हटले.
नागरिकांनी साबणाने हात धुतले तरी चालतील. पेपर सोपही चालतात. काही काळजी घेतल्यास याची भीती नाही. नागरिकांनी गरज असेल तरच प्रवास करावा. नागरिकांनी कोणत्याही परिस्थिती अफवा पसरवू नये, असेही ते म्हणाले.