Chaupher News

पिंपरी : संसर्जजन्य असलेल्या कोरोना विषाणूचे तीन रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यापार्श्वभुमीवर शहरातील ‘थिएटर’ व्यवस्थापकांनी चित्रपट प्रदर्शित करण्यापुर्वी अन् संपल्यानंतर संपुर्ण ‘थिएटर’चे निर्जंतुकीकरण करावे. सर्दी, खोकला आढळलेल्या नागरिकास थिएटर, मॉलमध्ये मध्ये प्रवेश देवू नये. एकाचवेळी क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश देवू नये. मॉलमधील रॅक दिवसातून सहावेळा निर्जंतूक करावेत. तळांची, शौचालयांची जंतूनाशक वापरुन दिवसातून चारवेळा स्वच्छता करावी, अशा सूचना महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी थियटर, मॉलच्या व्यवस्थापकांना लेखी पत्राव्दारे केल्या आहेत.
शहरातील मॉल्स, मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये नागरिक मोठ्या संख्येने गोळा होतात. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णाकडून अशा ठिकाणी विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असते. त्यापार्श्वभुमीवर खबरदारी घेण्यात यावी. थिएटरचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. खुर्च्यादेखील निर्जतुक कराव्यात. शौचालयामध्ये हॅण्डवॉश ठेवावेत. थिएटरमधील कर्मचा-याला सर्दी, खोकला असल्यास सुट्टी देण्यात यावी. सुट्टी देणे शक्य नसल्यास मास्क वापरणे अनिवार्य करावे. टप्प्याटप्प्याने नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश द्यावा. मॉलमधील तळांची, शौचालयाची जंतूनाशक वापरुन दिवासातून चारवेळा स्वच्छता करावी. कर्मचा-यांना वारंवार हात धुणे बंधनकारक करण्यात यावे. परिसरात स्वच्छता राखावी.

महापालिकेच्या कार्यालयामध्ये शेकडो नागरिक विविध कामानिमित्त येत असतात. त्याकरिता जिन्याचा वापर केला जातो. इमारतीमधील जिन्यांवर असलेले रेलिंगचा वापर केला जातो. त्यासाठी महापालिका मुख्यालसह, सर्व क्षेत्रीय कार्यालयातील जिन्यांचे रेलिंग, अधिका-यांच्या दालनातील दरवाजे, मुठ, सर्व शौचालयांची दिवसातून चारवेळा जंतूनाशक वापरुन साफसफाई करण्यात यावी. महापालिका सभागृह, स्थायी समिती सभागृह, आयुक्त दालनातील बैठक हॉल, टेबल, माईकची स्वच्छता करण्यात यावी. कोरोना विषाणूची बाधा झालेल्या, संशयित रुग्ण आढळून आलेल्या इमारतीच्या, सोसायटीच्या परिसरात फवारणी करण्यात यावी अशाही सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here