Chaupher News
पुणे : पुण्यात करोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पुण्यातल्या रुग्णांची संख्या आठवरुन नऊवर तर राज्यात आता एकूण १२ करोनाग्रस्त रुग्ण आहेत. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली आहे. अमेरिकेहून पुण्यात आलेल्या एका पुणेकराला करोनाची लागण झाल्याचं समजलं आहे. त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी भागातल्या करोनाग्रस्तांची संख्या आठवरुन नऊ अशी झाली आहे असंही नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केलं.