धुळे : साक्री तालुक्यातील शिरसोले येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेतर्फे सहल आयोजित करण्यात आली होती. वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, पर्यावरण व क्षेत्र भेट आदी संदर्भात याचे आयोजन करण्यात आले होते. बारावी व अकरावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची ही प्रात्यक्षिक शैक्षणिक सहल होती.
सौर उर्जा प्रकल्प, पवनउर्जा प्रकल्प (शिवाजीनगर), बळसाणे येथील जैन धर्मीय मंदिर, पाटण येथील आशा देवी, अनेर धरण, नागेश्वर सातपुडा परिसर, शिरपूर येथील बालाजी मंदिर आणि बागेला या सहलीदरम्यान भेट देण्यात आली. 80 विद्यार्थीनी या सहलीत सहभागी झाल्या होत्या. धुळे येथील प्रात्यक्षिक क्षैक्षणिक सहल प्रकल्प अधिकारी बी. डी. जैन, सहायक प्रकल्प अधिकारी डी. सी. ईशी (शिक्षण), शिरसोले येथील प्राचार्य एम. बी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. व्ही. आर. पाटील यांनी या सहलीचे आयोजन केले होते.
प्राचार्य एम. बी. निकम, प्रा. व्ही. आर. पाटील, प्रा. पी. के. पवार, श्रीमती जी. बी. पवार, श्रीमती एल. बी. अहिरराव, रंजिता नेवरे, सारिका बच्छाव, मनीषा गमवीर, व्यवस्थापक परमेश्वर संगेवार, विजय खैरनार, नितीन देवरे, बी. एस. अहिरे आदी सहलीत सहभागी झाले होते.