महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर व सत्ताधार्यांमध्ये हमरीतुमरी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापालिका सभेत आज महापौर व सत्ताधारी यांच्यात रणकंदन झाले. यावेळी नगरसेविका शमीम पठाण यांनी महापौरांच्या व्यासपीठाजवळ जात यांनीच पक्षाचे वाटोळे केले. यांनी पक्षाच्या बदनामीचा विडा उचलला आहे, असे वक्तव्य केल्यानंतर भडकलेल्या महापौरांनी मी पक्षाचा नाही, तर पक्षाने माझ्या बदनामीचा विडा घेतला आहे, असा आरोपच राष्ट्रवादी पक्षावर केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर व सत्ताधारी नगरसेवकांमध्ये गेल्या काही महिन्यापासून खटके उडताना दिसत आहेत. त्याचीच प्रचिती म्हणून महापौर व राष्ट्रवादी नगरसेवक यांच्यात जोरदार भडका उडाला. महापालिका सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या.
यावेळी महापौरांनी महापालिका आयुक्त यांना मूर्ती घोटाळ्याचा अहवाल सादर झाल्यानंतर पक्षनेत्या मंगला कदम यांनी हा अहवाल म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखा आहे, असे म्हणत सभेचे कामकाज तहकूब करावे, असा प्रस्ताव मांडला. त्याला अनुमोदन दिले गेले. मात्र, त्यानंतर नगरसेविका सिमा सावळे यांनी बोलायला हात वर केल्यानंतर महापौरांनी त्यांना परवानगी दिली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांना सभा तहकूब करा, अशी मागणी लावून धरली. त्याचे रुपांतर वादात झाले व पुढे शमीम पठाण, मंगला कदम, नारायण बहिरवाडे यांच्याविरुध्द महापौर, सीमा सावळे, आशा शेंडगे, असे चित्र पाहायला मिळाले.
महिला पदाधिकार्यांचा
महापालिकेत राडा
यावेळी महापौरांनी मला सभेचे नियम शिकवू नका सर्वांनी खाली बसा, असा आदेश दिला. मात्र सत्ताधार्यांनी सभागृह सोडले. त्यामुळे सभा तहकूब झाली. त्यानंतर सारी मंडळी महापौर कक्षात जमल्यानंतर महापौर शकुंतला धराडे, शमीम पठाण, सुजाता पालांडे, सीमा सावळे, आशा शेंडगे यांच्या चांगलीच भांडणे रंगली यामध्ये काही अपशब्दही महापौरांनी जाहीरपणे उच्चारले. त्यामुळे महापालिकेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
यानंतर महापौरांनी पक्षात असून, पक्षाची बदनामी केली. त्यामुळे महापौरांचाच राष्ट्रवादीच्या महिला शहाराध्यक्षा सुजाता पालांडे यांनी निषेध केला, तर महापौरांनी मी पक्षाचा कोणताही अवमान केलेला नाही, ज्यांना निषेध करायचा आहे त्यांनी तो खुशाल करावा. त्यांना वाटत असेल मी खासदार किंवा आमदारांची समर्थक आहे. तर मी आहे त्यांची समर्थक व मला विरोध करणारेसुध्दा कोणाशी हातमिळवणी करतात हे मला माहिती आहे, असे जाहीरपणेच सांगितले.
आचारसहिंतेचा भंग महापौंरानीच
केला : मंगला कदम
या प्रकारामुळे महापालिकेच्या प्रत्येक कार्यालयात चांगली खलबते रंगली होती. यावेळी पक्षनेत्या मंगला कदम यांनी सरळ महापौरांवर निशाणा साधत आचारसंहितेचा भंग झाला असेल, तर तो महापौर व भाजपच्याच नगरसेविकांनी केला. अधिकारी सांगत होते, असा अहवाल सादर करता येत नाही. तरी त्यांनी अहवाल सादर करायला लावला. त्यामुळे आचारसंहिता भंग झाली असेल, तरी ती महापौरांमुळेच झाली.