पिंपरी : पिंपरी गावातील महालक्ष्मी मरिआई माता मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण सोहळ्यांतर्गत आज प्रासाद अधिवास, नवग्रह होम अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
युवा उद्योजक संदीप वाघेरे यांनी महालक्ष्मी मरिआई माता मंदिराचा जिर्णोध्दार केला असून करवीरपीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते रविवारी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा होणार आहे. यानिमित्त गुरुवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. शनिवारी सकाळी युवा उद्योजक संदीप वाघेरे व शुभांगी वाघेरे यांच्या हस्ते व्दारपाल पुजन करण्यात आले. तसेच प्रासाद अधिवास, नवग्रह होम, तुळजा भवानी मंडळाचे भजन, रामरक्षा महिमा, विष्णू सहस्त्र नाम आदी धार्मिक कार्यक्रम झाले. योगेश पोपट वाघेरे व कमल वाघेरे, राजेंद्र गणपत वाघेरे व अनिता वाघेरे यांच्या हस्ते नवग्रह होमहवन झाले. या सर्व कार्यक्रमांना महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती शरद गावडे, माजी नगरसेवक संतोष कुदळे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गव्हाणे, बाळासाहेब वाघेरे, प्रविण शिंदे, शिवाजी वाघेरे, जितेंद्र वाटकर, हरिष वाघेरे, सुनील थरकुडे आदी उपस्थित होते. सायंकाळी किर्तनाचार्य लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे किर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरी गावातील मरीआई महालक्ष्मी माता मंदिरात नवग्रह होम
