पिंपरी ः वारंवार तक्रार करूनही शहरात विविध भागात कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी करूनही अधिकरी दुर्लक्ष करत आहेत. तीच स्थिती कचर्यांची आहे. त्यामुळे ऐन दिवाळीतही समस्या तशाच
आहेत, अशी तक्रार नगरसेवकांनी अधिकार्यांकडे केली आहे.
शहराच्या पिंपरी, चिंचवड, भोसरी, थेरगाव, रहाटणी आदी भागात पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यावरून स्थायी समितीने पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांना चांगलेच सदस्य नारायण बहिरवाडे, संपत पवार, कैलास थोपटे, सविता साळुंखे, अमिना पानसरे, शुभांगी लोंढे, अनिता तापकीर या सदस्यांनी धारेवर धरले. यावर अधिका-यांनी दोन दिवसात पाण्याची तक्रार दूर करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
तसेच कचर्याच्या गाड्याही वेळेत
नाहीत त्यांच्या कामात नियमीतताच नाही अशी तक्रारही नगरसेवकांनी केली. महापालिकेला विधान परिषदेची आचारसंहिता आहे. त्यामुळे स्थायी समितीमध्ये फक्त अवलोकनार्थ विषय मंजूर करण्यात आले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक यांचे भांडवल करत आहेत, असा आरोपही राष्ट्रवादी नगरसेवकांनी केला.