पिंपरी ः घरकुल योजना आर्थिक दुर्बल घटकांसाठी असून त्याऐवजी धनदांडग्यांनी घरकुल बळकावले आहे. त्यामुळे या योजनेत झालेल्या भ्रष्टाचारात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वरिष्ठ अधिका-यांचा सहभाग असल्याचा आरोप करताना कष्टकरी कामगार पंचायतीतर्फे बोगस लाभार्थींवर कारवाई करण्याची मागणी बाबा कांबळे यांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात बाबा कांबळे म्हणाले की, घरकुलमधील बोगस लाभार्थींच्या चौकशीसाठी व लाभार्थींना घरकुल मिळावे, या मागणीसाठी 20 ऑक्टोबर रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेलेल्या घरकुलधारकांना सुरक्षा रक्षकांनी आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना भेटण्यास मज्जाव केला होता. यामुळे संतप्त झालेल्या घरकुल धारकांनी घोषणाबाजीसह ठिय्या आंदोलन सुरू केले. याची दखल घेऊन सहाय्यक आयुक्त सुभाष माचरे यांनी आंदोलकांशी चर्चा करून निवेदन स्वीकारले.
यानंतर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असतानाही महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी यांनी संगनमत करून आचार संहिता भंग केली.