कोंडीबा आणि शकुंतला शिवले यांचे अभिष्टचिंतन
पिंपरी : मोठी माणसे अनुभवाने समृद्ध असतात, आदर्श असतात. त्यांच्या कर्तबगारीतूनच समाज घडतो, नव्या पिढीला समाजसवेचा वसा आणि वारसा मिळतो, असे मत ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी व्यक्त केले.
चिंचवडच्या वाल्हेकरवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कोंडीबा शिवले यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा अमृतमहोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. कोंडीबा यांच्या पत्नी शकुंतला शिवले यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचेही अभिष्टचिंतन या वेळी करण्यात आले. कवी नायगावकर यांच्या हस्ते शिवले दाम्पत्याचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. या वेळी नायगावकर बोलत होते.
आमदार लक्ष्मण जगताप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. संत साहित्याचे अभ्यासक चंद्रकांत वांजळे, पुरुषोत्तम पाटील, जळगाव येथील ‘दीपस्तंभ’चे विश्वस्त यजुर्वेन्द्र महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, शिक्षण मंडळाचे सभापती निवृत्ती शिंदे, उपसभापती विष्णू नेवाळे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, बाळासाहेब तरस, संगीता भोंडवे, माजी सरपंच बबन दगडे, पंढरीनाथ शिवले, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सहायक सचिव अनिल गुंजाळ, साहित्यिक वि. दा. पिंगळे आदी या वेळी उपस्थित होते.
नायगावकर या वेळी म्हणाले की, समाजासाठी आयुष्य वेचने ही काही साधी गोष्ट नाही. त्यासाठी आयुष्य उकळत ठेवावे लागते. जीवनकार्य हे प्रवाही असले म्हणजे त्याचे वाहणे थांबत नाही. ते पुढे जात राहते.त्यागातून माणसे उभी राहतात. मोठी होतात. नावारुपाला येतात. थोरामोठ्यांचे अनुभवांचे बोल नव्या पिढीने ऐकावे, समजून घ्यावे, आचरणात आणावेत, असे मला वाटते.
आमदार जगताप म्हणाले की, आईवडील मुलांचे मन, मेंदू आणि मनगट बळकट करून त्यांना समाजमनात आदर्श जीवन जगण्याचे संस्कार देतात. शिक्षण देतात. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असते.
महाजन म्हणाले की, सध्याचे जग हे इलेक्ट्रॉनिक वस्तुंनी भरलेले आहे आणि थोडासा स्वत:चा जास्त विचार करणारे आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा याला आपण इतके महत्व देतो की, कुटुंब, कुटुंबातले संबंध, प्रेम व कृतज्ञतेची भावना विसरत चाललो आहोत. नव्या पिढीला याचे महत्व वेळीच पटवून द्यायला हवे.
वांजळे म्हणाले की, आईवडील ही मुलांना आयुष्यभर पुरेल एवढी मोठी शिदोरी असते. संस्काराचे, विचारांचे ते विद्यापीठ आहे. जगातल्या सर्व तीर्थक्षेत्रात आईवडील हे तीर्थक्षेत्र महान आहे. घरातली मोठी माणसे ही अनुभवाची समृद्ध खाण असते. आधी ती आपल्याला जपत असतात. आता आपण त्यांना जपायचे असते. प्रेरणादायी कार्य करणार्या किसन चौधरी, तुकाराम गुजर, अभिमन्यू चौधरी, वसंत दळवी, प्रभाकर मेरुकर, जालंदर खळदकर, ज्ञानेश्वर गद्रे, अशोक भंगाळे, दिलीप भांगरे आणि वैष्णवी पेंढारकर यांना या वेळी मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. ‘देव माझा’ या विशेषांकाचे या वेळी प्रकाशन करण्यात आले. अविनाश वाळुंज यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविक केले. पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी
आभार मानले.
नाना शिवले, ज्ञानेश्वर शिवले, सार्थक शिवले, पोपट शिवले,पांडुरंग शिवले, सुरेश शिवले, भिकाजी शिवले, नंदकुमार शिवले, बाळू शिवले, झुंबर शिवले, ज्ञानोबा शिवले, शुभम शिवले, गौरव शिवले यांनी केले.